News

सर्वसामान्यांचे रोजचे जेवण परिपूर्ण बनवणारी तूर सध्या आख्ख मार्केट गाजवत आहे.

Updated on 02 August, 2022 4:11 PM IST

सर्वसामान्यांचे रोजचे जेवण परिपूर्ण बनवणारी तूर सध्या आख्ख मार्केट गाजवत आहे.अस म्हणणं देखील वावग ठरणार नाही. कारण सध्या बाजारात तुरीला (Tur Price Increase) विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी (Agriculture) वर्ग देखील आनंदात आहे. पण तुरीला बाजारात एवढा

विक्रमी दर का मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात वाढच होत आहे. याची सविस्तर कारणे जाणून घेऊयात.बाजारात का मिळतोय तुरीला विक्रमी दर?बाजारात तुरीला मोठी मागणीसध्या बाजारात तुरीची मागणी वाढली. ज्याचं कारण म्हणजे प्रक्रिया उद्योगात तुरीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असतानाच तुरीचे नवीन

उत्पादन निघण्यास अद्याप 8 महिन्यांचा काळ बाकी आहे. याच कारणामुळे बाजारात तुरीची आवक कमी आहे. म्हणूनच सध्या तुरीला विक्रमी दर मिळत आहे.यंदा तूर लागवड कमीगतवर्षी खरिपात 39 लाख हेक्टरवर तुरीची लागवड (Tur Cultivation) करण्यात आली होती. परंतू यावर्षी 31 लाख हेक्टर इतकीच तुरीची लागवड झाली

आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 8 लाख हेक्टरवर तुरीच्या उत्पादनात घट होताना दिसून येणार आहे. तर देशाप्रमाणे यंदा महाराष्ट्रात देखील तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होणार आहे.यंदा तूर उत्पादनात का होणार घट?खरिप हंगामात कडधान्यात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके म्हणजेच तूर मूग आणि उडीद होय. खरिपात शेतकऱ्यांचा कडधान्यांची पेरा करण्याकडे

जास्त कल असतो. त्याचप्रमाणे यंदा खरिपात आतापर्यंत 91 लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची पेरणी झाली आहे. तर यंदाच्या वर्षी गतवर्षीपेक्षा कडधान्यांचा 6.49 टक्क्यांनी अधिक पेरा झाला आहे. तर या कडधान्यांच्या पेरणीमध्ये सर्वाधिक ला पेरणी ही मुगाची झाली आहे. तर उडदाची पेरणी

देखील आठ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र तुर पेरणीमध्ये मोठी घट झाली आहे.किती मिळतोय तुरीला भाव?नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीला जवळपास 7000 दर मिळाला आहे. तर अमरावती बाजार समितीत 7740 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी चांगलाच आनंदात आहे.

English Summary: Turi is fetching 'so much' record price in the market, because...
Published on: 02 August 2022, 04:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)