तूर उत्पादन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या इतर पिकांच्या तुलनेत तूर उत्पादकांना चांगला दर मिळत आहे. सध्या तूर पिकासोबतच उडीद पिकालाही चांगले भाव मिळत असताना पाहायला मिळत आहेत.
तुरीला काल २७ सप्टेंबर रोजी कमाल ८ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे तर उदिडला कमाल ९ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला आहे. उडीद आणि तुरीच्या तुलनेत सोयाबीनचे दर आपण पाहिले, त्यामानाने (Soybean Market Price) म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही. हा बाजारभाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहे.
शेतकऱ्यांनो घरबसल्या सुरू करा बटाटे आणि तांदळापासून 'हा' भन्नाट व्यवसाय; जाणून घ्या सविस्तर
सोयाबीनला कमाल ७ हजार १११ रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून ३५१ क्विंटल सोयाबीनची (Soybean Market Price) आवक झाली आहे.
यासाठी किमान भाव ४ हजार २००, कमाल भाव ७ हजार १११, सर्वसाधारण भाव ६ हजार ३८३ इतका मिळाला. मात्र इतर बाजार समितीमधील दर पाहिले तर ४००० ते ५००० दरम्यान कमाल दर मिळत आहे.
सर्वाधिक आवक पाहिली तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली असून याठिकाणी आवक ३ हजार ९०८ क्विंटल (Soybean Market Price) इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार आनंदाचा काळ; वाचा आजचे राशीभविष्य
सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत नवीन तीन नियम लागू; गुंतवणूक करण्याआधी वाचा संपूर्ण माहिती..
नॅनो-फर्टिलायझर लिक्विड शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा वाचवणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Published on: 28 September 2022, 09:57 IST