News

पिंपरी ता. कोरेगाव: कोविड-19 च्या संकटात नागरिकांना बाहेर पडण्यावर मर्यादा आहेत हि बाब लक्षात घेवुन महाराष्ट्र शासन कृषि विभाग बंधावर खते व बियाणे वाटप कोरणा चा संसर्ग टाळता यावा आणि कृषी सेवा केंद्रावर गर्दी कमी होईल या उद्देशाने खते व बियाणे अशा कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पुरवठा कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे गट तयार करून गटाची एकत्रित खते व बियाणे या कृषी निविष्ठांची मागणी गटप्रमुख यामार्फत नोंदवून कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बांधावरच पुरवठा करण्यात येत आहे.

Updated on 18 June, 2020 12:02 PM IST


पिंपरी ता. कोरेगाव:
कोविड-19 च्या संकटात नागरिकांना बाहेर पडण्यावर मर्यादा आहेत हि बाब लक्षात घेवुन महाराष्ट्र शासन कृषि विभाग बंधावर खते व बियाणे वाटप कोरणा चा संसर्ग टाळता यावा आणि कृषी सेवा केंद्रावर गर्दी कमी होईल या उद्देशाने खते व बियाणे अशा कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पुरवठा कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे गट तयार करून गटाची एकत्रित खते व बियाणे या कृषी निविष्ठांची मागणी गटप्रमुख यामार्फत नोंदवून कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बांधावरच पुरवठा करण्यात येत आहे.

श्री. विजयकुमार राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा यांनी मार्गदर्शन करताना सागितले की, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)  अंतर्गत तुर बियाणे बि.डी.एन. 711 वाणाचे बियाणे प्राधान्याने क्रॉपसॅप अंतर्गत निवडलेल्या प्लॉट, शेतीशाळा, प्रात्यक्षिके अंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांना बियाणे वितरीत करण्यात येत आहे.टोकण करताना एका ठिकाणी एक बि टोकताना 1 मीटर अंतर ठेवावे. एक मिटर अंतराने बी टोकण केल्यास प्रति हेक्टरी 400 ग्राम बियाणे पुरेसे होते. रायझोबियम या द्रवरूप जैविक संघाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. जेणेकरून बीज प्रक्रियेतून सोयाबीन पिकात उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सोयाबिन पिकावर लागणिनंतर आठ ते दहा दिवसामध्ये खोड माशी खोडकिडे यांच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता आसते. रासायनिक बिजप्रक्रिया थायरम, 50 टक्के ईमीडाक्लोप्रीड यांचा वापर करावा. तसेच शेतकऱ्यांचा होणारा अनावश्यक अर्थिक खर्चात बचत होईल.

श्री. महेश झेंडे उपविभागिय कृषि अधिकारी सातारा यांनी सांगितले कि शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकासोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबागा लागवड करावी. फळबाग कमी पाण्यात,कमी मनुष्यबळात व कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना फळबाग लागवड फायदेशीर ठरत आहे. आंबा, सिताफळ, डाळींब या सारख्या फळपिकांची लागवड केल्यास कुटुंबाची फळांची गरज भागुन पुरक आर्थिक उत्पन्नात भर पडुन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यास मदत होईल.

मंडल कृषि अधिकारी श्री. ज्ञानदेव जाधव यांनी मार्गदर्शन करताना सागितले की, कोविड-19 च्या पार्शभुमिवर रहिमतपुर मंडल कृषि विभागामार्फत या वर्षी शेतकरी गाटांच्या मार्फत बांधावर खते व बियाणे वाटप, हुमणी किड नियांत्रण मोहिम, सोयाबिन उगवण क्षमता चचणी प्रात्यक्षीक व बिज प्रक्रिया बांधावर तुर लागवड, शेतकऱ्यांची शेतीशळा, पिक प्रात्यक्षिक पेरणी यंत्राच्या/रुंद सरी वरंबा (बि.बि.एफ), सहाय्याने पेरणी करणे अश्या स्वरुपात कृषि विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी चालु आहे.

सोयाबिन बिज प्रक्रिया व तुर बियाणे वाटप कार्यक्रमास श्री. विजयकुमार राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा, श्री. महेश झेंडे उपविभागिय कृषि अधिकारी सातारा, तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शेळके श्री. ज्ञानदेव जाधव, मंडल कृषि अधिकारी, आत्मा चे बिटिएम दिलीप जाधव, कृषि पर्यवेक्षक श्री. इंगळे, कृषि सहाय्यक श्री. सुजित शिंदे, श्रीमती. सुरेखा पवार, प्रगतशिल शेतकरी श्री. विनायक जाधव, अशोक तुपे, वसंत कदम, संदेश कणसे व गटामधील सर्व सदस्य उपस्थित होते.

English Summary: Tur and trap crops should be planted on the farm bund
Published on: 18 June 2020, 08:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)