देशात काल मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ची घोषणा केली होती. यामुळे सगळीकडे घराघरांवर तिरंगा बघायला मिळाला. असे असताना आता नांदगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सगळीकडे शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी ध्वजरोहण केल्यानंतर ध्वज संहिता पाळावी लागते.
ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा तर सूर्यास्तावेळी उतरवावा. अशा प्रकारची ध्वजसंहीता असतानाही नांदगावच्या तहसील कार्यलयात ध्वज रात्री साडेदहा नंतरही खाली उतरविलेला नसल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. चार वेगवेगळ्या उपोषणांनी येथील तहसील विभागासह वीज वितरण विभागाची लक्तरेही टांगली गेलीत. हे कमी होते की काय म्हणून अजून एक प्रताप केला गेलाआहे.
देशात याबाबत सगळीकडे सूचना देण्यात आल्या होत्या. हर घर तिरंगा या माध्यमातून देशात प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला गेला. यासोबत याचे नियम देखील पाळणे गरजेचे होते, सरकारी कार्यलय, सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज संहिता कायम होती. ज्या अनुषंगाने सूर्योदयाच्या वेळी ध्वजरोहन, तर सायंकाळी सुर्यास्ता वेळी ध्वज रीतसर खाली उतरवला गेला पाहिजे.
एकाच पिकात चार पिके, नवीन तंत्रज्ञानामुळे मिळणार बक्कळ पैसा..
असे असताना मात्र नांदगाव तहसील कार्यालयात रात्री साडेनऊ वाजले तरी ध्वज खाली उतरणण्यात आला नाही. यामुळे याची चर्चा सुरु आहे. यामुळे आता या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली जात आहे. सुट्टी साजरी करायला हे अधिकारी गेले होते का असा प्रश्न उपस्थित केला जास्त आहे. यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
तुमच्या कारमधील एअरबॅगची किंमत किती माहितेय? नितीन गडकरींचे उत्तर सांगून तुम्हाला धक्काच बसेल
आकडा टाकणारांनो सावधान! महावितरण ठेवणार करडी नजर, 131 कोटींच्या विजचोऱ्या उघडकीस
काय तो पैसा, काय ते अधिकारी, एकदम ओकेच!! आयकरच्या छाप्यात इतका पैसा की रक्कम मोजायला लागले तब्बल १४ तास..
Published on: 16 August 2022, 03:54 IST