केंद्रीय कृषी, सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत नागपूर येथील प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्रातर्फे सेंद्रीय शेती, शेतीवरील संशोधन व्यवस्थापन जैविक वस्तूंचे उत्पादन, गुणवत्ता तपासणी, व सेंद्रीय उत्पादनाचे विपणन इत्यादी संदर्भात 30 दिवसीय अवधीचे दोन प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी 28 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर 2018 आणि 8 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2019 पर्यंत असेल. प्रशिक्षणाचे स्थळ हे प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र, अमरावती रोड, गोंडखैरी, नागपूर-23 आहे.
सदर अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर पात्र आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना विहित नमुन्यात पूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रासह प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्र नागपूर येथे सदर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती या https://ncof.dacnet.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अभ्याक्रमासाठी निवास व भोजन व्यवस्था केंद्रातर्फे करण्यात येणार आहे. प्रवासी भत्ता व दैनिक भत्ता हा मात्र उमेदवारांना दिला जाणार नाही.
सदर अभ्याक्रमाला प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2018 (02.30 वाजेपर्यंत) असून केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. डी. कुमार (संपर्क क्रमांक-07118-297054) यांनी सेंद्रीय शेती अभ्याक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन उमेदवारांना केले आहे.
Published on: 21 November 2018, 07:34 IST