पुणे - राज्यातील दूध शेतकऱ्यांना व्यावसायिक अंगाने दुग्धजन्य पदार्थनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी 50 लाख रुपये खर्च करुन प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
राज्यातील शेतकऱयांना सर्वात मोठा जोडधंदा म्हणून दुग्ध क्षेत्राचा विस्तार होतो आहे, मात्र सध्या फक्त दूध उत्पादित करणे व खासगी किंवा सहकारी दूध प्रकल्पांना पुरविणे, अशी मर्यादित भूमिका शेतकऱ्यांची ठेवली गेली आहे. शेतकऱ्यांना दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थनिर्मिती बाबत वर्षानुवर्षे काहीही सांगण्यत आले नाही. त्यामुळे या क्षेत्रात शेतकऱ्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र भविष्यात मोलाची भूमिका बजावेल, अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.
हेही वाचा : स्मार्टफोन खरेदीसाठी हे राज्य सरकार शेतकऱ्यांना करणार 40 टक्के मदत
शेतकऱ्यांना दूध उत्पादनात आपल्यानंतर 15 दिवसांनी हमखास आर्थिक स्रोत उपलब्ध होतो. मात्र त्यामधून होणारा फायदा मर्यादित आहे. या उलट शेतकऱ्यांना जर दुधावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण दिल्यास ते चित्र पालटू शकते. प्रक्रिया युक्त पदार्थांच्या विक्रीतून शेतकऱ्याला 30 ते 50 टक्क्यांपर्यंत जादा नफा मिळू शकतो. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असरणारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या सुविधा तयार झालेल्या नाहीत. कृषी विद्यापीठे किंवा दुग्धविकास खात्याने ही बाबची दखल घेत विविध विभागांमध्ये या पूर्वीच दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थ निर्मितीची प्रशिक्षण केंद्रे उभारणे आवयश्यक होते.
मात्र ही दुरुस्त करण्याचा पुढाकार राहुरी विद्यापीठापासून होत आहे. राज्याच्या दुग्धविकासासाठी ही बाब समाधान देणारी आहे, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. दरम्यान राज्याच्या दूध उत्तपादनात नगर, पुणे, कोल्हापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत. हे तिन्ही जिल्हे राहुरी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. तेथे विशेष प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यात पहिले केंद्र कोल्हापूरला उभे राहण्याची चिन्हे आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने विद्यापीठाच्या अखत्यारित्या असलेल्या कृषी विद्यालयाला विशेष निधी देखील मंजूर केला आहे. राज्य शासनाने निधी व मनुष्यबळ दिल्यास अन्य जिल्ह्यात देखील केंद्रे उभी राहू शकतील, अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली.
Published on: 24 January 2022, 08:40 IST