News

राज्यात सध्या महावितरणकडून वीज तोडणी सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पूर्वीच्या सरकारने आणि आताच्या सरकारने तीच परंपरा कायम ठेवल्याने शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Updated on 25 November, 2022 1:41 PM IST

राज्यात सध्या महावितरणकडून वीज तोडणी सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पूर्वीच्या सरकारने आणि आताच्या सरकारने तीच परंपरा कायम ठेवल्याने शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी आता शेतकरी संघटना पुढे येत आंदोलन करत आहेत. आता तेच सत्तेत बसले की पांढरे फिके होतात. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी शेतकऱ्याचा बळी हा जाणारच आहे.

त्यामुळे शेतकऱ्याच्या विजेला कोणी हात लावाल तर आम्ही कायदा हातात घेऊ, वीज कंपनीचा कोणताही अधिकारी वीज तोडण्यासाठी आला तर त्याच्या तोंडाला काळे फासू. तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन! इथेनॉलमुळे कारखान्यांची परिस्थिती सुधारणार

खोक्याचे सरकार आमचा ओकेच कार्यक्रम करत आहे. यामुळे मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतो, की आमची वीज तोडू नका. आधी आमच्या उसाची बिले वेळेत द्या, असेही ते म्हणाले. ते इंदापूरमध्ये बोलत होते.

सध्या महावितरणकडून इंदापूर तालुक्यात कृषिपंपांची वीज तोडणीची मोहीम सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याने थकबाकीसह चालू वीज बिले भरावीत, असे महावितरणचे म्हणणे आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

नाशिक येथील १५ व्या कृषीथॉनमध्ये बीकेटीने केले जागतिक दर्जाच्या कृषी उत्पादनांचे अनावरण

या पार्श्वभूमीवर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी महावितरणचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत राज्य सरकारला थेट इशारा दिला. यावेळी अमरसिंह कदम यांनी आक्रमक होत सरकारवर त्यांनी टीका केली.

महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक
राजू शेट्टी यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण, चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित
पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, व्हायरसच्या हल्ल्यात बागा उद्ध्वस्त

English Summary: touch electricity, law our hands, Amarsingh Kadam warning Mahavitran
Published on: 25 November 2022, 01:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)