News

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा वातावरणावर परिणाम झाला आहे. यामुळे विदर्भात अवकाळीने हजेरी लावली असून आज (दि.१२) रोजी देखील विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात गारपीटीसह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे नुकसान झालंय

Updated on 12 February, 2024 5:24 PM IST

१.अल निनो चे संकट टळले,यंदा सर्वत्र मुसळधार
२.विदर्भात अवकाळीचा अंदाज कायम; गारपीटीचा पिकांना फटका
३.मराठवाड्यात पाणीटंचाई गंभीर समस्या
४.गुलाबाची आवकेत वाढ,फुलांना मिळतोय चांगलाच दर
५.हरभऱ्याच्या किमतींत वाढ


१.अल निनो चे संकट टळले,यंदा सर्वत्र मुसळधार

अल निनो प्रभावामुळे देशातील मान्सुनचे चक्र विस्कळीत होते.त्यामुळे त्याचा परिणाम हवामानावर होतो कुठे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते तर कुठे पुरस्थिती निर्माण होते.परंतु आता यावर्षी अल निनो चा प्रभाव हा जुनपर्यंत संपणार आहे.त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.व गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडू शकतो.असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 


२.विदर्भात अवकाळीचा अंदाज कायम; गारपीटीचा पिकांना फटका

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा वातावरणावर परिणाम झाला आहे. यामुळे विदर्भात अवकाळीने हजेरी लावली असून आज (दि.१२) रोजी देखील विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात गारपीटीसह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे नुकसान झालंय. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. गेल्यावर्षी अवकाळी आणि गारपिठीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.विदर्भात जोरदार गारपीटीने हजेरी लावली आहे. यामुळे फळपिकांचे आणि रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीतील जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, तूर, कांदा, संत्रा आणि भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.वातावरणात बदल झाल्यामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात १२ फेब्रुवारीपर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील शेतकरी आता चिंतेत आहेत.


३.मराठवाड्यात पाणीटंचाई गंभीर समस्या

शेती अभ्यासक सोमिनाथ घोळवे यांनी फेसबुक वर एक पोस्ट केलीय त्यात मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत सांगितल आहे.त्यात त्यांनी लिहल आहे.रखरखते ऊन, दुष्काळी परिसर आणि जवळपास सर्वच विहिरी आटलेल्या आहेत. तर बोअरवेल देखील आटू लागल्या आहेत. त्यामुळं किमान पिण्यासाठी पाणी हवं म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडून बोअरवेल घेणे चालू आहे. अशीच रखरखत्या उन्हात ऐकुरका ता.केज जि.बीड. येथील एका शेतकऱ्याने रात्री बोअरवेल घेतली. बोअरवेल घेताना असे पाणी वरती आले.अशी पोस्ट सोमिनाथ घोळवे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट च्या माध्यमातुन टाकलीय.

४.गुलाबाची आवकेत वाढ,फुलांना मिळतोय चांगलाच दर

सद्या व्हॅलेनटाईन वीक चालु आहे.त्यामुळे बाजारात फुलांची मागणाी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यातच गुलाबाची आवक वाढली आहे.आणि गुलाबाच्या दरात ५० टक्यांची वाढ झाली आहे.त्याचा निश्चितच फायदा गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.व्यापाऱ्यांनी गुलाबाची आवक वाढवली आहे.मागिल काही दिवसांपासुन गुलाब चे भाव देखील वाढले आहेत.गुलाबाचे फुल प्रतिडझन १५ ते २० रूपयांनी महागले असुन अजुन दरात वाढ होउ शकते असे व्यापारी म्हणत आहे.त्यामुळे निश्चितच गुलाब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

५.हरभऱ्याच्या किमतींत वाढ

देशात अनेक संकटांनी शेतकरी भरडला जातो आहे.अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याची पाहायला मिळते. एकीकडे प्रचंड उत्पादन खर्च आणि दुसरीकडे उत्पादित शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.त्यात आता हऱभरा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.सद्या हरभऱ्याच्या दरात मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे.त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे .सद्या हरभऱ्याच्या स्पॉट अकोला किमती या सप्ताहात ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,९०० वर आल्या आहेत.आता सद्या हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

English Summary: top 5 important news of agriculture, know in one click agriculture updated news
Published on: 12 February 2024, 05:24 IST