शेतीमालाला हमीभाव भेटून शेतकऱ्यांच्या पदरी चार रुपये पडावे म्हणून नाफेडच्या वतीने देशभरात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. सध्या खरीप हंगामातील तूर या पिकाच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र उभारण्यात आले आहे. मागील महिन्यापासून ही खरेदी केंद्र सुरू केली असून शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच राहिलेला आहे. आता तर खरेदी केंद्रावर नोंदणी तर दुसऱ्या बाजूला खुल्या बाजारात विक्री सुरू आहे अशी अवस्था चालू आहे. कारण हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारात तूर पिकाच्या जास्त भाव मिळत आहेत. तूर उत्पादकांनी निर्णय बदलला असून खुल्या बाजारात तूर विक्री सुरू केली आहे. हमीभाव केंद्रावर तूर पिकाला ६ हजार ३०० ररूपये भाव मिळत आहे तर त्यापेक्षा खुल्या बाजारात तुर पिकाला जास्त भाव मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला खरेदी केंद्रावर तूर पिकाच्या जास्त दर होते मात्र आता चित्र बदलले आहे. हमीभाव केंद्रावर आवक कमी होत असून खुल्या बाजारपेठेत तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
नोंदणी केली मात्र बाजारातच :-
हंगामाच्या सुरुवातीला तूर पिकाच्या खुल्या बाजारपेठेत ५ हजार ८०० रुपये भाव तर हमीभाव केंद्रावर ६ हजार ३०० रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीला हमीभाव केंद्रावर नोंदणी सुरू केली. मात्र मागील १५ दिवसांपासून आवक वाढली असून आता खुल्या बाजारपेठेत दर वाढले आहेत. खुल्या बाजारपेठेत तुरीला ६ हजार ५०० रुपये दर मिळत असून नियम आणि अटीमध्ये गुंतून राहत नसल्याने शेतकऱ्यांनी तुरीसाठी खुल्या बाजारपेठेला निवडले आहे. जरी नोंदणी खरेदी केंद्रावर असली तरी शेतकरी त्याची पर्वा न करता खुल्या बाजारपेठेत तूर विक्री करत आहेत.
नियम-अटींचाही आवकवर परिणाम :-
देशभरात जी हमीभाव केंद्र उभारली आहेत त्या केंद्रावर कमी आर्द्रतेच्या शेतीमालाला प्राधान्य दिले जाते. नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रातून एसएमएस आला तरच शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन जाता येतो नाहीतर वाट पाहावी लागते. तसेच केंद्रावर नियमांचे पालन करून खरेदीयोग्य माल असेल तर घेतला जातो नाहीतर परत पाठवला जातो. तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ८ दिवसात पैसे जमा होणे अपेक्षित असते मात्र महिना जरी उलटला तरी पैसे जमा होत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी रोख व्यवहारासाठी खुली बाजारपेठ निवडली आहे.
साठवणूकीवरही भर :-
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे तूर पिकाच्या अगदी अंतिम टप्प्यात शेंगअळीचा वाढता प्रादुर्भाव झाला असल्याने तूर उत्पादनात घट झाली आहे. जे की सोयाबीन आणि कापसाचे जसे दर वाढले त्याप्रमाणे तूरीचेही दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जर चांगले दर भेटले तर तूर पिकाची विक्री नाही साठवणूक केली जाईल असे शेतकऱ्याचे मत आहे.
Published on: 25 March 2022, 03:37 IST