News

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यानं शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पण पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Updated on 02 August, 2023 3:46 PM IST

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यानं शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पण पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं पीक विम्याची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. 31 जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यामध्ये बदल करुन तीन ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pik Vima) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे.

त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) अर्ज केला नाही, त्या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज भरावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा (Pik Vima) भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली.

लोकप्रतिनिधी यांना लोकांचे काही देणंघेणं नाही जनता मेली काय आणि राहिली काय, राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.

अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार
शेतकऱ्यांनो शिमला मिरची शेती करणार असाल तर जाणून घ्या रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय
शेतकऱ्यांनो शिमला मिरची शेती करणार असाल तर जाणून घ्या रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय

English Summary: Tomorrow is the last day for farmers to apply for crop insurance, farmers crowd at Setu Kendra..
Published on: 02 August 2023, 03:46 IST