News

मागील काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली होती. या घसरणीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देणे पसंत केले होते. रस्त्यांवर अक्षरशा टोमॅटोचा लाल चिखल पाहिला मिळाला होता.

Updated on 07 December, 2021 10:47 AM IST

 मागील काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली होती. या घसरणीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देणे पसंत केले होते. रस्त्यांवर अक्षरशा टोमॅटोचा लाल चिखल पाहिला मिळाला होता.

परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे इतर शेती पिकांसोबतच टोमॅटो पिकाचे ही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पुढील काळात पुरवठा आणि मागणी हे प्रमाण विस्कळीत झाल्यामुळे दक्षिण भारतातील बऱ्याच भागात टोमॅटोच्या दरात फार मोठी उसळी पाहायला मिळत आहे. दक्षिण भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

 परंतु जर आपण उत्तर प्रदेश राज्याचा विचार केला तर तेथे काही भागांमध्ये टोमॅटो किमतीत काही प्रमाणात घट पाहायला मिळाली. सोमवारी उत्तर प्रदेश मध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 30 ते 40 रुपये प्रति किलोच्या दरम्यान होते. तर पश्चिम विभागात टोमॅटो चा किरकोळ दर सोमवारी 30 ते 85 रुपये प्रति किलोच्या दरम्यान राहिला.

तसेच पूर्वेकडील भागात टोमॅटोचे दर 39 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पाहायला मिळाले. असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.गेल्या आठवड्यात अखिल भारतीयटोमॅटोचे सरासरी मॉडेल किंमत पाहिली तर ती साठ रुपये प्रति किलो होती.

 दक्षिण भारतातील टोमॅटोची स्थिती

 स्पोर्ट ब्लेअर मध्ये टोमॅटोचा भाव सोमवारी 127 रुपये किलो तर केरळच्या तिरुअनंतपुरम मध्ये एकशे पंचवीस रुपये प्रति किलो तसेच पलक्कड आणि वायनाड मध्ये 105 रुपये प्रति किलो, कोझीकोड मध्ये 91 रुपये आणि कोट्टायम मध्ये 83 रुपये प्रति किलो दर होता. 

कर्नाटक राज्यातील मंगळुरू आणि तुमकूर या मोठ्या शहरांमध्ये सोमवारी टोमॅटोचे दर शंभर रुपये किलोच्या पातळीवर राहिले. धारवाड मध्ये टोमॅटोचा भाव 75 रुपये किलो आणि मैसूर मध्ये 74 रुपये किलो होता. कर्नाटकातील शिमोगा मध्ये 67 रुपये तर बेंगळुरूमध्ये 57 रुपये किलो होता. तामिळनाडूमधील सोमवारी टोमॅटोच्या भावाचा विचार केला तर रामनाथपुरम मध्ये एकशे दोन रुपये प्रति किलो तर चेन्नई मध्ये चारशे रुपये प्रति किलो होता.( संदर्भ-वेबदुनिया)

English Summary: tommato rate in many part of india reach 100 ruppes per kg
Published on: 07 December 2021, 10:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)