News

मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण झाली. रक्ताचे पाणी करून पिकवलेला टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. प्रमाणात आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Updated on 30 August, 2021 12:43 PM IST

 मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण झाली. रक्ताचे  पाणी करून पिकवलेला टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. प्रमाणात आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

 त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की एक किमान पन्नास हजार रुपयांची तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी किसान सभा व समविचारी संघटनांच्‍या कार्यकर्त्यांनी काल रविवारी अकोले येथील समशेरपुर बाजार समितीमध्ये तीव्र आंदोलन केले. पुढे त्यांनी इशारा दिला की जर या बाबतीत सरकारने लवकर पावले उचलली जात नाहीत तर सत्ताधारी आणि विरोधकांच्या दारात टोमॅटो फेकले जातील असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.

 राज्यात सध्या टोमॅटो उत्पादकांवर घरात झालेल्या घसरणीमुळे प्रमाणात अरिष्ट ओढवले आहे. अशा परिस्थितीत  राज्यकर्ते आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. ही संतापजनक बाब असून राज्यकर्त्यांनी विरोधकांनी या संकटाच्या काळात  एकमेकांवर चिखलफेक करणे थांबवावे व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जर असे झाले नाही तर मात्र सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्ष्यांच्या नेत्यांच्या दारा टोमॅटोओतण्याचे  आंदोलन हाती घ्यावी लागेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

 या आंदोलनात टोमॅटो उत्पादकांच्या असलेल्या काही मागण्या

  • महाराष्ट्रा बाहे रइतर राज्यात टोमॅटोची मागणी कोठे आहे याचा तातडीने शोध घेऊन या राज्यांना टोमॅटो पुरवण्यासाठी महाराष्ट्राच्या पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत.
  • कोवीड लॉकडाऊन चा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत. विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन हे उद्योग तातडीने सुरू करावेत याबाबत सरकारने पावले टाकावीत.
  • बाजार समित्यांमध्येकोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणात उभारणी करावी जेणेकरून भविष्यकाळात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागू नये.

 

  • टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनामाल तारण कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावे तसेच टोमॅटोचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले टाकावी.
  • भारतातील शेजारील देश दशकीय नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना टोमॅटोचे निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवावेत.
  • तसेच टोमॅटो पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशके, खते यासारख्या निविष्ठांच्या किंमत वाढवून कंपन्यांकडून उत्पादकांचे शोषण केले जाते. या बाबतीत सरकारने हस्तक्षेप करून सर्व निविष्ठा योग्य दरात शेतकऱ्यांना मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा.

 या आंदोलनात डॉ. अजित नवले, एकनाथ मेंगाळ, संदीप दराडे, तुळशीराम कातोरे, पांडुरंग कातोरे, सुनील दराडे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

English Summary: tommato producer farmer give altimetam to goverment
Published on: 30 August 2021, 12:43 IST