नई दिल्ली: महिन्याभरात टोमॉटोचे दर चार पटीने वाढले आहेत. टोमॉटो सध्या बाजारात ८० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात टोमॉटोचे दर २० रुपये प्रति किलो होते. परंतु देशातील अनेक शहरात टोमॉटोचे दर ७० ते ८० रुपये किलो झाले आहेत. ग्राहक प्रकरणाची माहिती ठेवणाऱ्या मंत्रालयानुसार, चेन्नई व्यतिरिक्त सर्व मेट्रो शहरात टोमॉटोचा खुदरा भाव ६० रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त झाला आहे. गुरुग्राम, गंगटोक, आणि रायपूरातील शहारात ७० रुपये प्रति किलो दराने टोमॉटो विकला जात आहे.
लखनौ, गोरखपूर, कोटा आणि दीमापूर येथे टोमॉटोचा दर हा ८० रुपये प्रति किलोग्रॅम प्रमाणे आहे. दरम्यान टोमॉटो उत्पादक राज्यात हैदराबादेत टोमॉटो ३७ रुपये चेन्नईत ४० रुपये आणि बंगळुरूमध्ये ४६ रुपये किलो दराने विकला जात आहे. दरम्यान ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पावसान यांनी याची पृष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॉ़टोचे दर वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. टोमॉटोचा हंगाम संपल्याने किंमती वाढल्याचे कारण पासवान यांनी सांगितले.
दिल्लीतील आझादपूर फळ आणि भाजी मार्केट मधील व्यापारी दीपक गोयल यांच्या मते, मुसळधार पावसामुळे उत्पादक राज्यातून येणाऱ्या मालाची आवक कमी झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, तमिळनाडू, केरळ, जम्मू- काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यात टोमॉटोचे उत्पादन कमी होते. हे राज्य इतर राज्यांवर अवलंबून असतात. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात वर्षाला १.९७ कोटी टन टोमॉटोचे उत्पादन होते. वर्षाला याची विक्री १.१५ कोटी टन आहे. आपल्या देशात टोमॉटोचे उत्पादन मागणी पेक्षा जास्त आहे.
Published on: 13 July 2020, 04:12 IST