मुंबई
टोमॅटोचे भाव वाढल्याने गृहणींच आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र टोमॅटो उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावामुळे करोडपती झाले आहे. काही उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटोमुळे नशीब बदले आहे. देशात टोमॅटोचे यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळाला आहे. काही भागात १०० ते १५० किलोचा भाव टोमॅटोला मिळत आहे.
तेलगंणातील मेडक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक घेतले आहे. नेमके दर वाढलेले असतानाचा टोमॅटो काढणीला आल्याने हा शेतकरी चांगलाचा मालामाल झाला आहे. मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावातील बी महिपाल रेड्डी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महिपाल रेड्डी आधी त्यांच्या २० एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे. पण, त्यानंतर त्यांनी टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जणू त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना महिपाल रेड्डी म्हणाले की, शेतात एक कोटी रुपयांचे टोमॅटोचं पीक शिल्लक आहे. संततधार पावसामुळे पिकाचं नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची काळजी वाटत आहे. रेड्डी यांनी स्वतःची २० एकर जमीन सोडून त्यांनी ८० एकर भाडेतत्त्वावर घेतली असून ६० एकरमध्ये भातशेती केली आहे आणि उर्वरित जमिनीवर ते इतर पिके घेतात.
Published on: 27 July 2023, 03:31 IST