अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. असे असताना आता राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत आला आहे. सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. 80 रुपयांवरुन टोमॅटोचे दर आता 25 ते 30 रुपयांवर आले आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे. दहा दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. काही दिवसांपूर्वी टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदात होते.
शेजारील राज्य कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून राज्यात टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळं दर घसरत आहेत. यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. हे दर आणखी घसरण्याची शक्यता देखील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी लासलगाव बाजारपेठ (Lasalgoan) सर्वात महत्वाची समजली जाते.
फलोत्पादन शेत्रातल्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार
त्याचप्रमाणे अलीकडच्या वर्षात गिरणारे बाजारपेठ भाजीपाला त्यातही टोमॅटो पिकासाठी महत्वाची मानली जाते. मात्र त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर हे दर घसरले आहेत. यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र त्यांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
गव्हाच्या दरात मोठी वाढ! प्रति क्विंटल 900 रुपयांपर्यंत झाली वाढ..
दरम्यान, अगोदरच अवकाळी पावसामुळे संकटात असलेला टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने अजूनच संकटात सापडला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवले गेले आहे. यामुळे आता शेतकरी अवकाळीच्या मदतीची मागणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
मराठवाडा टँकरमुक्त! पाण्याचा प्रश्न मिटला, भूजल पातळीत 2 मीटरची वाढ
आता लम्पीनंतर घोड्यांमध्ये ग्लेंडर्स रोगाचा शिरकाव, माणसांना देखील धोका,संसर्ग झाल्यास थेट मृत्यू..
'साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात'
Published on: 02 November 2022, 01:55 IST