काही दिवसांपासून श्रीलंकेत मोठी आर्थिक परिस्थिती उदभवली आहे, आता पाकिस्तानातील पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर लाहोरमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असून टोमॅटोचा भाव येथे 500 रुपये किलोवर पोहोचला आहे. पुरामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर दुकानदारांनी मनमानी किंमती निश्चित केल्या आहेत. कांदा 300 रुपये किलो आणि लिंबू 400 रुपये किलोने विकला जात आहे.
टोमॅटोची किंमत 80 रुपये प्रति किलो या सरकारी दरापेक्षा किमान सहा पटीने जास्त आहे, तर कांदे 61 रुपये किलो या सरकारी दराच्या पाच पटीने विकले जात आहे. आले आणि लसणाच्या दरातही वाढ झाली आहे. एका खरेदीदाराने सांगितले, "आता गरीब माणूस फक्त टोमॅटो पाहू शकतो, ते विकत घेऊ शकत नाही.
ते म्हणाले, "कधीही 100 रुपयांच्या वर विकला जाणारा कांदा आता 250 किंवा 300 रुपयांना विकला जात आहे." अचानक आलेल्या पूर आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्यांनी पाकिस्तानमध्ये नासधूस केली आहे, प्राथमिक अंदाजानुसार देशाचे आधीच $5.5 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे, यामुळे अनेक अडचणी आल्या आहेत.
बारामती ॲग्रोच्या अडचणी वाढण्याची शक्यता, तानाजी सावंत यांनी भरले कारखान्याचे 9 कोटी...
सिंध आणि पंजाब प्रांतात ऊस आणि कापूस पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत तर कांदा, टोमॅटो आणि खरीप मिरचीचे अंशतः नुकसान झाले आहे. एकट्या कापूस पिकांचे 2.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानची कापड आणि साखर निर्यात एक अब्ज डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हवामानात मोठा बदल! आजपासून 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात, पंजाबराव डख यांची माहिती..
सिंधमधील सरकारी गोदामांमध्ये साठवलेला किमान 20 लाख टन गहू पाऊस आणि पुरामुळे खराब झाला असून त्यामुळे देशाच्या अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. कृषी क्षेत्रातील विध्वंसाचा अर्थ असा आहे की पाकिस्तानला केवळ उद्योगांसाठी पुरवठ्याची कमतरता भासणार नाही तर देशात बियाणांचे संकट देखील येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या;
आताची मोठी बातमी! पुण्यात दारू बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश..
दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान, शरद पवारांकडून कौतुक
केंद्र सरकारची मोठी घोषणा! कृषी पायाभूत सुविधांसाठी दिली 14 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
Published on: 29 August 2022, 05:37 IST