राज्यात आणि देशात टोमॅटोला सोन्याचे भाव आले आहेत. टोमॅटोचे दर चांगलेच वधारले आहेत. बाजारात टोमॅटोच्या किमतींनी अगदी 200 रूपये प्रतिकिलोचा आकडाही गाठला आहे. यानंतर सोशल मीडियावरही टोमॅटोच्या दरांबाबत जोक्स आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे टोमॅटो सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटोपुरवठा करणारी बाजारपेठ अशी ओळख जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बाजार समितीला आहे. या समितीच्या आवारात एक आगळंवेगळं टोमॅटो पाहायला मिळालं. मंगळवारी विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोमध्ये गणपती बाप्पानं दर्शन दिलं आहे. गणपती बाप्पाच्या आकाराचा एक लक्षवेधी टोमॅटो येथील एका मजुराच्या हाती लागला.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन : 2023 निमित्त महाबलीपुरम येथे संमेलन संपन्न
या टोमॅटोचा फोटो समोर येताच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उत्तर भारतातून नारायणगाव परिसरात अनेक व्यपारी आणि 1000 पेक्षा जास्त मजूर टोमॅटो क्रेट भरण्यासाठी दाखल झाले आहेत. यातच उत्तर प्रदेशच्या बवई (ता. ग्यानपूर, जिल्हा भांनडोही) येथील मजूर शिवराज बिंद हा सुद्धा दाखल झाला आहे. मंगळवारी टॉमेटो निवड आणि पॅकिंग करत असताना त्याला बाप्पाच्या आकाराचं हे अनोखं टोमॅटो दृष्टीस पडलं.
बाप्पाच्या आकाराचं टोमॅटो पाहून शिवराजलाही विशेष वाटलं. यानंतर शिवराजने या टोमॅटोसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे टोमॅटोनं ग्राहकांची चिंता वाढवली असतानाच दुसरीकडे या टोमॅटोनं मात्र सगळ्यांचंच मन जिंकलं आहे.
EPFO: PF खात्याशी लिंक केलेले बँक खाते काही मिनिटांत बदलता येते, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Published on: 13 July 2023, 08:22 IST