Tomato Market Update :
एका महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती २०० रुपये किलो पार झाल्या होत्या. त्यामुळे शेतकरी मालामाल झाले. पण आता पुन्हा एकदा टोमॅटोचे दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्यास सुरुवात केली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर मधील टोमॅटो उत्पादकांनी दर नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावात टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटोला भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला आहे. टोमॅटोच्या क्रेटला १०० ते २५० रुपये भाव मिळल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. दुष्काळाचे सावट आणि त्यातच टोमॅटोला भाव नाही. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिला आहे.
सोशल मिडीयावर देखील टोमॅटो फेकून दिल्याचे व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होऊ लागलेत. छत्रपती संभाजीनगरमधील बाजारात शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिला आहे. तर नाशिकमधील शेतकऱ्याने दराअभावी टोमॅटो पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र सद्यस्थितीत टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. टोमॅटो दर नसल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर टोमॅटो चिखल होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती, निफाड, छत्रपती संभाजीनगर भागातील शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून देत आपला रोष व्यक्त केला.
Published on: 08 September 2023, 01:48 IST