नाशिक
राज्यभरात टोमॅटोचे भाव चांगलेच वाढलेत. जरी दरात चढउतार जरी होत असली तरी टोमॅटोच्या दर वाढलेलेच पाहायला मिळत आहेत. पहिल्यादा टोमॅटोच्या दराने शंभरी गाठल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे.पण केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतल्यापासून टोमॅटोचे देशातील दर कमी झाले आहेत.
नाशिकच्या बाजार समितीत टोमॅटोचे दर निम्म्यावर आलेत. २० किलो कॅरेटचा (२० किलो) दर आधी २ हजार २०० रुपये होता. पण आता तोच दर १ हजार १०० ते १ हजार २०० रुपयांवर आला आहे.
केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेपाळहून उत्तर भारतात टोमॅटोची आयात सुरु झाली आहे. तसंच या आयातीमुळे भाव पडल्याची खंत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसंच केंद्र सरकारने टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला आणि दरात घसरण झाली असल्याचं नाशिकमधील शेतकरी सांगतात.
Published on: 14 August 2023, 03:57 IST