नाशिक
नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात एक हटकेबाज शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आलेला पोस्टर लावण्यात आलेला आहे. धुळवड गावात लावण्यात आलेला हा पोस्टर आता चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. हा पोस्टर टोमॅटोमुळे करोडपती, लखपती झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेला आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला आता टोमॅटोच्या दरामुळे चांगले दिवस आले आहेत. टोमॅटोची लाली ही शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देणारी ठरली आहे. तसंच यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना निसर्ग आणि बाजाराने साथ दिल्याने धुळवड गावच्या शेतकऱ्यांना जणू लॉट्रीच लागली आहे.
दरम्यान, मागील महिन्यापासून टोमॅटोच्या दरात झालेली वाढ आजूनही कायम आहे. सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. एकूणच २० किलोची एक कॅरेट सुमारे २१००-२००० रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत.
Published on: 28 July 2023, 04:31 IST