News

यावर्षी अतिवृष्टीमुळे अगोदरच खरीप हंगाम शेतकर्यांदचा वाया गेलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. याही संकटावर मात करत शेतकऱ्यांनी कशीबशी रब्बी हंगामाची तयारी केली.

Updated on 01 February, 2022 1:04 PM IST

यावर्षी अतिवृष्टीमुळे अगोदरच खरीप हंगाम शेतकर्‍यांचा वाया गेलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. याही संकटावर मात करत शेतकऱ्यांनी कशीबशी रब्बी हंगामाची तयारी केली.

आता रब्बी हंगामातील कांदा, गहू आणि हरभरा यासारखी पिके  पाणी देण्याच्या टप्प्यात असताना शेतकऱ्यांचा समोर आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे. ते म्हणजे राज्यात महावितरण कडून  कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून राज्यातील विविध शेतकरी संघटना या विरोधात आक्रमक झाले आहेत. कृषी पंपाच्या वीज तोडणी विरोधात आज शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षातर्फे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील  वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

 हे बेमुदत धरणे आंदोलन दररोज सकाळी अकरा ते चार या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे. महावितरणच्या या वीज तोडणी मोहिमेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.वीजतोडणी मुळे शेतकऱ्यांना पाणी असून देखील पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतातील उभी पिके जळून जाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत एबीपी माझाशी बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले की, महावितरण ने सुरू केलेली ही कारवाई बेकायदेशीर असून त्यामुळे शेती उत्पादन घटून अन्न सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा कायद्याचा भंग करणारी ही कारवाई असल्याचे घनवट म्हणाले. राज्य सरकार वीजपुरवठा साठी जेवढे अनुदान देते तेवढे सुद्धा शेतकऱ्यांना वीज दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी वीज कंपनीचे देण्याचा लागत नाही. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 15 दिवस आधी नोटीस दिल्याशिवाय वीज कनेक्शन कट करता येत नाही. परंतु कुठल्याही प्रकारच्या नोटीस न देता वीज कनेक्शन कट करत आहेत त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग आहे. त्यासोबतच वीज कायद्याप्रमाणे शेतीसाठी 230 ते 240 होल्ट प्रमाणे वीज पुरवठा सलग करणे बंधनकारक आहे. पण सध्या 150 ते 180 होल्टेजने वीज पुरवठा होत आहे.या अशा बर्‍याच कारणांमुळे ही कारवाई थांबवावी यासाठी आजपासून महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आह.(स्त्रोत-एबीपीमाझा)

English Summary: todays movement oppose to mahavitaran in state by farmer organization
Published on: 01 February 2022, 01:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)