News

आशिया खंडातील सर्वात मोठा बायो सीएनजी प्रकल्प मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे उभा राहिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Updated on 19 February, 2022 9:23 AM IST

आशिया खंडातील सर्वात मोठा बायो सीएनजी प्रकल्प मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे उभा राहिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथील ट्रेंचिंग मैदानामध्ये जवळजवळ पंधरा एकर जागेवर या बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाला संपूर्ण खर्च दीडशे  कोटींच्या घरात आला असून या प्रकल्पात दर दिवशी 17 ते 18 टन सीएनजी गॅस तयार होणार आहे. त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे शंभर टन जैविक खताचे देखील उत्पादन या प्रकल्पाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या जैविक खताचा वापर जैविक शेतीसाठी करण्यात येणार असून या प्रकल्पातून तयार होणारा गॅस तीन  टप्प्यात तयार करण्यात येणार आहे. या सीएनजी  गॅसचा वापर हा सार्वजनिक वाहतुकीमध्ये तसेच कारपोरेशन च्या 400  बस मध्ये करण्यात येणार आहे.

या प्रकल्पातून इंदूर शहरांमधील जवळ जवळ 300 ते 400 बस चालविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बायो सीएनजी प्रकल्पाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सीएनजीच्या बाजार किमती पेक्षा सरकारला कमीत कमी या प्रकल्पातून पाच रुपये कमी दराने सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या माध्यमातून सरकारचाकोट्यवधी रुपयांचा महसूल तर वाचलेच तसेच शेतकऱ्यांसाठी जैविक खताची देखील उपलब्धता निर्माण होणार आहे.

 काय असतो नेमका सीएनजी गॅस?

 सीएनजी हे वायुरूप इंधन असून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस याचे हे संक्षिप्त रूप आहे. मराठी मध्ये बोलायचे झाले तर याला दाबा खालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे देखील म्हणता येईल. नैसर्गिक वायू वर दाब देऊन सीएनजी तयार करतात.नैसर्गिक वायूवर दाब दिल्याने नैसर्गिक वायूचे घनफळ खूप कमी होते. 

कोणत्याही प्रवासी या मालवाहू वाहनांमध्ये डिझेल अथवा पेट्रोल ऐवजी सीएनजी गॅस वापरता येतो. कारण पेट्रोल आणि डिझेल चा सगळ्यात स्वस्त व कार्यक्षम पर्याय हा सीएनजी गॅस आहे. यासाठी वाहनांमध्ये सीएनजी चे परिवर्तन अथवा रूपांतर करणारे संच किंवा सीएनजी इंजिन बसवले जाते. आशा वाहनाच्या टाकीमध्ये 15 लिटर पेट्रोलच्या तुलने एवढा सीएनजी  भरता येतो.

English Summary: todays inaguration of asias biggest bio cng project in indore by narendra modi
Published on: 19 February 2022, 09:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)