News

ई पंचनामा केल्यामुळं आता शेतकऱ्यांना जलद गतीनं मदत पोहोचू शकणार आहे. नागपूर जिल्ह्यात ई पंचनाम्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झालाय. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्व विदर्भात ई पंचनाम्याचा प्रयोग राबवण्यात आला.

Updated on 15 September, 2023 2:09 PM IST

१. मराठवाड्यात उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक
छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर ही मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या बैठकीला संपूर्ण मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित असणार आहेत. तसेच महत्त्वाचे सचिव देखील असणार आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.. या बैठकीत मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी कॅबिनेटमध्ये विविध निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..तसंच प्रलंबित फाईल आणि मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांची लगबग सुरु आहे.

२. नागपूर जिल्ह्यात ई पंचनाम्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी
ई पंचनामा केल्यामुळं आता शेतकऱ्यांना जलद गतीनं मदत पोहोचू शकणार आहे. नागपूर जिल्ह्यात ई पंचनाम्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झालाय. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्व विदर्भात ई पंचनाम्याचा प्रयोग राबवण्यात आला. साधारणपणे अतिवृष्टी झाल्यानंतर महसूल विभागाचे तलाठी आणि कृषी विभागाचे कृषी सेवक काही निवडक शेतावर जाऊन पंचनामे करायचे. त्यामुळं बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहायचे.

३.पाण्याअभावी शेतकऱ्याने लिंबाची बाग पेटवून दिली
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोथरे गावात एका शेतकऱ्याने लिंबाची बाग पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोथरे गावातील शेतकरी शहाजी झिंजाडे यांनी त्यांची दोन एकर बाग पाण्याअभावी उपटून टाकून पेटवून दिली आहे. पावासाचा खंड असल्यामुळे लिंबाची बाग त्याच्या नजरेसमोर जळू लागली होती. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

४. शनिवारी राज्यात पावसाचा जोर वाढणार
ऑगस्ट महिन्याच्या पावसाच्या विश्रांतीनंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झालीय. गुरुवारपासून राज्यातील अनेक भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसंच राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचंही हवामान खात्याने सांगिलतंय. आज शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उद्या शनिवारी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

५. बेंगलोरमध्ये कोल्ड चेन अनब्रोकन कार्यक्रमाचे आयोजन
कर्नाटकमधील बेंगलोर शहरातील ताज बेंगलोर विमानतळावर WIZ द्वारे कोल्ड चेन अनब्रोकन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. हा कार्यक्रम भारताच्या कोल्ड चेन उद्योगासाठी महत्त्वाचा आहे. औषध,अन्न, तंत्रज्ञान आणि इतर विविध बाबीवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे उद्घाटन एयर फ्रेट एंड फार्मा, विज फ्रेटचे ग्लोबल हेड सतीश लक्कराजू, बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे व्यवसाय उपाध्यक्ष रवीन पिंटो यांच्या हस्ते करण्यात आलंय. या कार्यक्रमात कृषी जागरण माध्यम समूह देखील सहभागी झालाय. तसंच कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक यांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हजेरी लावलीय. तसंच या कार्यक्रमात अनेक विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलीय.

English Summary: Today's important news of the state in one click
Published on: 15 September 2023, 02:08 IST