संग्रामपूर : देशातील शेतकऱ्यांना बोंड अळी मुक्त कपासी उत्पादनासाठी BG4/BG7 बीटी बियाणे, व सोयाबीनचे बीटी बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारवर शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण करण्यासाठी देशातील पहिला शेतकरी शेतमजूरांचा रणसंग्राम आज २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पातुर्डा येथे शेतकरी नेते मा.राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.देशातील १३० कोटी जणतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या माझ्या कष्टकरी
शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न वाढीसाठी सरकार कडून कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बियाणे सुद्धा दिल्या जात नाही. शेतकरी कपाशी पिकावरील बोंडअळी ने त्रस्त झालेला आहे, हे बियाणे बदलने फार गरजेचे आहे. त्यामुळे कपाशी बोंडअळी मुक्त करण्यासाठी BG4, BG7, बियाणे उपलब्ध करून द्या. व भारतामधे परदेशातुन जीएम ( बिटी ) सोयाबीन पेंड आयात करुन विकल्या जाते, पंरतु शेतकऱ्यांना मात्र जीएम बिटी सोयाबीन लागवडीसाठी बंदी घातली आहे. ते बीटी सोयाबीन बियाणे ऊपलब्ध करून द्या,
शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करुन कृषीविज बिल माफ करा, शेतकरी व शेतमजुरांना १० लाख रुपयांचा विमा सुरूक्षा कवच लागु करा, शासनाच्या नाकर्तेपणामुळे (क्षारयुक्त पाणी) किडणीच्या आजाराने मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करा, घरकुल योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांचे नावे पात्र यादित समाविष्ट करून शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना ३ लाख रुपये अर्थसहाय्य करा, या मागणीसाठी व शेतकरी शेतमजुरांनवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज रविवार दि.२७ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजता
आठवडी बाजार पातुर्डा येथे शेतकरी नेते मा.खा. राजु शेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील बंगाळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांचा राज्यव्यापी रणसंग्राम होणार असुन शेतकरी शेतमजूरांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी यावेळी केले आहे.
Published on: 27 February 2022, 01:02 IST