शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक परंपरा आहेत. या परंपरा जपणासाठी शेतकरी नेहेमीच पुढे असतो. आता आज असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे.
अनेक ठिकाणी आजही ही परंपरा जपली आहे. ग्रामीण भागात आपआपसातील देवाणघेवाण आणि शेतीविषयक व्यवहार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसालाच केली जातात. शेतकरी शेतीच्या कामावर सालगडी बारा महिन्याकरिता घेतात. यामुळेच गुढीपाडवा येण्यापूर्वीचा सालगड्याचा शोध घेतला जातो. सालगडी आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन सालगडी ठेवतात. पण, तो गुढी पाडव्यापासूनच. अशी ही परंपरा आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे.
असे असताना आता मात्र हे सालगडी जास्तीचे पैसे मागतात. यामुळे आता शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागतात. यामुळे पाडव्याला सालगडी काय मागतो ह्याची चिंता असते. पूर्वी धान्य दिले तरी सालगडी येत होते. आता मात्र परिस्तिथी बदलली आहे. शेतकरी अनेक संकटांचा सामना सध्या करत आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे तो अडचणीत आला आहे.
अश्यातच महागाई वाढली आहे, खतांच्या किमती, महागाई देखील वाढली आहे. यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. आजचा दिवस त्याच्यासाठी सोनेरी क्षण असला तरी सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती ही वाईट आहे. त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. तसेच अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
सध्या पाणी दिसले की लाव कांडी असं सुरु पण..., शरद पवारांनी सांगितला अतिरिक्त उसावर पर्याय
डिझेल दरवाढीमुळे मशागत महागली, दरवाढीचे कारण देत केली जातेय लूट, वाचा काय आहे एकरी दर
शेतकऱ्यांनो शेततळे अनुदानात झालीय वाढ, भविष्याचा विचार करून आताच करा सोय, 'असा' करा कर्ज
Published on: 02 April 2022, 04:11 IST