News

पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Updated on 01 August, 2020 12:00 PM IST


पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सून आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून आसामपर्यंत सक्रिय आहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीरवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे मंगळवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पोषक हवामान होत आहे.

आज कोकणामधील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्नामाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पोषक ठरल्याने राज्यात सोमवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज कोकणता जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातून तुरळक ठिकाणी तर मराठवाडा , विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. शुक्रावारी सकाळपर्यंतच्या २४ तासात राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

दरम्यान  देशाच्या इतर राज्यातही पाऊस होत आहे.  पुढील २४ तासात केरळ, कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, उप हिमालयी, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि आसामामधील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. पुर्वेकडील भारत, गोवा, दक्षिण- पश्चिम मध्य प्रदेश, पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

English Summary: today Heavy rains expected in central Maharashtra
Published on: 01 August 2020, 06:34 IST