महाराष्ट्रामध्ये तुरीची लागवड बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. जर आपण डाळवर्गीय पिकांच्या विचार केला तर सर्वात जास्त लागवड तुरीची केली जाते. तूर हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी फायदा देणारे पीक म्हणून ओळखले जाते. सध्या तुरीला प्रति क्विंटल सहा ते आठ हजार च्या दरम्यान भाव मिळत असून आपण या लेखात राज्यातील काही निवडक बाजारसमितीमध्ये आज तुरीला काय भाव मिळाला त्याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! कांद्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे बाजारभाव..
तुरीचे आजचे बाजारभाव
1- उदगीर- उदगीर बाजार समितीमध्ये आज तुरीची 96 क्विंटल आवक होऊन झालेल्या लिलावात तुरीला कमीत कमी सात हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तुरीच्या दरांची सरासरी सात हजार 750 रुपये राहीली.
3- अकोला- अकोला बाजार समितीमध्ये आज 272 क्विंटल तूरीची आवक होऊन झालेल्या लिलावात तुरीला कमीत कमी चार हजार 500 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सात हजार 800 रुपये दर मिळाला. तुरीच्या भावाचे सरासरी सात हजार 395 रुपये प्रतिक्विंटल राहिली.
3- मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती- मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन क्विंटल तूरीची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार 351 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाचे सरासरी ही 2500 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
नक्की वाचा:दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अंदाज..
4- वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती- वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तुरीची 450 क्विंटल आवक होऊन झालेल्या लिलावात तुरीला कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे 25 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाचे सरासरी ही सात हजार रुपये प्रति क्विंटल इतके राहिली.
5- बीड कृषी उत्पन्न बाजार समिती (पांढरी तूर)- बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोळा क्विंटल तूरीची आवक झाली व झालेल्या लिलावात कमीत कमी पाच हजार 610 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सहा हजार 951 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाचे सरासरी सहा हजार 589 रुपये प्रति क्विंटल इतके राहिली.
6- अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती- अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1902 क्विंटल तूरीची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार 600 रुपये दर मिळाला. भावाचे सरासरी सात हजार 300 रुपये प्रति क्विंटल इतके राहिली.
8- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तुरीची 189 क्विंटल तूरीची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी सहा हजार 900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 7585 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाचे सरासरी सात हजार 242 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
Published on: 18 October 2022, 04:30 IST