हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अत्ता शेतकरी फक्त १० दिवसांमध्ये चार तयार करू शकणार आहेत.हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अत्ता कमी वेळात चार तयार करणार आहेत जे की अत्ता मक्याच्या बियापासून हायड्रोपोनिक ट्रेमध्ये पाणी शिंपडून चारा पिकवता येणार आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी अत्ता फक्त १० दिवसांमध्ये चारा पिकवणार आहे जे की त्यांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहेत. परंतु हायड्रोपोनिक तंत्रज्ञान द्वारे जी शेती केली जाणार आहे ते त्यांना खूप खर्चिक आहे. पण तुम्ही ज्या स्थानिक बाजार पेठेत जी साधने आहेत त्याचा वापर करून अत्ता कमी खर्चात शेतकऱ्यांना चारा पिकवता येणार आहे.स्थानिक बाजारपेठ मध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याचा वापर करून शेतकरी ग्रीन हाऊस तयार करत आहेत जे की हायड्रोपोनिक तंत्रज्ञान द्वारे चारा पिकवत आहेत.
आपल्याला ग्रीन हाऊस उभा करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे जसे की बांबू, लाकूड, लोखंडी पाईप तसेच पीव्हीसी पाईप सारख्या वस्तू लागणार आहेत. ग्रीन हाऊस मध्ये स्टँड तयार करण्यासाठी बांबू किंवा पीव्हीसी पाईपचा वापर करता येणार आहे.ग्रीन हाऊस, पाण्याची टाकी तसेच हायड्रोपोनिक तंत्रज्ञान या वस्तूंचा वापर करून शेतकरी वर्ग चारा पिकवणार आहेत पण चारा पिकवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. जसे की यामध्ये मक्याची न कापलेले व स्वच्छ बियाणे वापरावे जे की उन्हामध्ये त्या बिया चांगल्या सुकल्यानंतर त्या बिया पाण्यामध्ये टाकून आपल्या स्वच्छ हाताने त्या बिया स्वच्छ कराव्यात. पाण्याने भरलेल्या बदलीमध्ये त्या बिया टाकल्या जातात.
हेही वाचा:येवला तालुक्यात भाजीपाला लागवडीसाठी वेग,भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ
जे बियाणे आपण पाण्याच्या बदलीमध्ये टाकणार आहोत त्यामध्ये जे बियाणे पाण्यावर तरंगतील ते बियाणे वापरले जात नाहीत कारण त्याची उगवण्याची जी क्षमता असते ती खराब असते त्यामुळे ते वापरले जात नाहीत. जेव्हा आपण वर सांगितलेली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली की नंतर बदलीमध्ये १ मिली हायड्रोजन पेरोक्साइड टाकावे व नंतर त्या बिया एका ज्यूट ट्रे मध्ये भराव्या आणि उगवण्यासाठी ठेवाव्या. परंतु एक काळजी यामध्ये घ्यावी लागणार आहे जे की जी जागा उबदार तशीच स्वच्छ आहे त्याच ठिकाणी पोत्यात बियाणे ठेवावे. जेव्हा बियाणे उगवतील त्यावेळी ते एका ट्रे मध्ये ठेवावे. यानंतर १० दिवसात हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानद्वारे चारा तयार होईल.
Published on: 02 August 2021, 06:29 IST