News

मुंबई: राज्यातील रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी व रोहयो विभागाने तुती लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Updated on 13 March, 2020 8:26 AM IST


मुंबई:
राज्यातील रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी व रोहयो विभागाने तुती लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात तुती लागवड व रेशीम उद्योगाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, सहसचिव गणेश पाटील, अशोक अत्राम, रेशीम विभागाचे उपसंचालक ए. एम. गोऱ्हे उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यामध्ये ज्या ठिकाणी रेशीम उत्पादनासाठी तुती लागवडीचे काम चालू आहे. त्या जिल्ह्यांतील कामांना प्रोत्साहन द्यावे. यासाठी लागणारे अंडीपुंज केंद्र तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठामार्फत त्यांना सहकार्य करावे. ज्या जिल्ह्यांमध्ये तुती उत्पादनासाठी वाव आहे. राज्यातील प्रमुख सहा जिल्हे असून या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर रेशीम उत्पादनाला चालना द्यावी. तसेच कृषी रेशीम पिकाला कृषी पिकाचा दर्जा मिळाणे गरजेचे आहे. तसेच यासाठी तांत्रिक सहाय्य रेशीम विभागाच्या वतीने करण्यात यावे, असे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

तुतीचे मराठवाडा विभागात औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद येथे जास्तीत जास्त प्रमाण आहे. रेशीम उत्पादनाची बाजारपेठ साखळी पद्धतीने तयार करण्याचे निर्देशही श्री. भुसे यांनी यावेळी दिले. जास्तीत जास्त रेशीम उत्पादनासाठी अंडकोष निर्मिती होऊन याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी आयुक्त स्तरावर कीटक शास्त्रज्ञांची बैठक घेण्यात यावी, असे कृषी व रोहयो विभागाचे सचिव श्री. डवले यांनी सांगितले.

English Summary: To promote the silk industry, the Department of Agriculture and mahaegs should encourage mulberry cultivation
Published on: 13 March 2020, 08:24 IST