सध्या ऊस गाळपचा हंगाम हा अंतिम टप्यात आहे मात्र अजून काय अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटला नाही. यंदा उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे कारखान्यांचे नियोजन लागले नाही त्यामुळे अजून काही भागातील अतिरिक्त ऊस हा उसाच्या फडातच आहे. आता सध्या ही सर्व परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे मात्र मागील १५ वर्षांपूर्वीच कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील महादेव कवडे या शेतकऱ्याला अशा संकटांचा सामना करावा लागला होता. कारखान्यांकडून ऊस तोडणीसाठी झालेली टाळाटाळ आणि ऊस बिलासाठी झालेला त्रास यामुळे महादेव कवडे यांनी स्वतःच्या शेतात गुऱ्हाळ सुरू केले. महादेव कवडे हे यामधून केमिकलमुक्त गूळ तयार करून लाखो रुपयांचे उत्पन्न दरवर्षी काढत आहेत.
अशी झाली सुरवात :-
दरवर्षी च अतिरिक्त उसाचा प्रश्न उपस्थित असतो. महादेव कवडे हे सुद्धा पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड करत असायचे जे की ऊस गाळपाच्या समस्येला त्यांना मागील १५ वर्षांपूर्वीच सामोरे जावे लागले होते. महादेव कवडे यांनी त्याचवेळी असा निर्णय घेतला की आतापासून आपण स्वतःच ऊसगाळप करायचा. मात्र कारखाना उभा करायचे म्हणजे आपल्याजवळ जास्त भांडवल लागते त्यामधून त्यांनी पर्याय काढत गुऱ्हाळ टाकण्याचा निर्धार घेतला. ५ गुंठ्यामध्ये त्यांनी गुऱ्हाळ टाकून ते त्यामधून चांगला फायदा काढत आहेत.
केमिकल मुक्त गुळाला मागणीही :-
कवडे यांनी गुऱ्हाळ टाकताच यामधून तयार होणारा गूळ हा केमिकलयुक्त असणार असा त्यांनी निश्चय केला. ज्या गोष्टीला मागणी त्याचे उत्पादन घ्यायचे हे सूत्र त्यांनी अवलंबिले होते म्हणून आजच्या स्थितीला फक्त कळंब तालुक्यातच न्हवे तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तर बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि लातूरमध्ये सुद्धा कवडे यांच्या गुळाच्या ढेपिला मागणी आहे. वर्षाकाठी कवडे यामधून ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न काढत आहेत शिवाय त्यांच्या उसाचा देखील प्रश्न मार्गी लागला.
कारखान्यांकडून दुजाभाव :-
यंदा क्षेत्र वाढले असून अतिरिक्त उसाचा जरी प्रश्न उदभवला असेल तर दरवर्षी ही परिस्थिती असतेच. जरी ऊस कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी असले तरी कारखान्यात वेगळीच वास्तविकता चालू असते. अगदी ऊसतोड कामगारांपासून ते कारखान्याच्या चेअरमन पर्यंत सर्वांची मर्जी शेतकऱ्यांना राखावी लागते. उसबिल काढण्यासाठी तर कारखान्याचे उंबरठे शेतकऱ्याला झिजवावे लागतात तेव्हा कुठे शेतकऱ्याला बिल भेटते ते सुद्धा पूर्ण भेटत नाही.
Published on: 28 March 2022, 06:05 IST