छत्रपती संभाजीनगर
मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकरी संकटात आले आहेत. पेरणी नंतर बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आता कृषी विभागाकडे प्राप्त होण्यास सुरुवात झाली असल्याने पंचनामे सुरु झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या २२० शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल झाल्या आहेत. बीडच्या अंबाजोगाईतील ६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील ३६ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेल्या सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचे नऊ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल नाशिक येथील प्रयोगशाळेकडून शनिवारी रात्री देण्यात आला.
दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बोगस बियाणाचा फटका बसला आहे. अंबाजोगाईमध्ये आधीच एक महिना उशिरा पेरणी झाली आहे. त्यातच आता पेरलेले बियाणे उगवून न आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
Published on: 25 July 2023, 01:29 IST