News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत.

Updated on 01 September, 2023 3:37 PM IST

पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. पुणेरी पगडी आणि सन्मानचिन्ह देऊन मोदींचा सन्मान करण्यात आला आहे. दरवर्षी १ ऑगस्ट लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित असल्याने विरोधी पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, "महाराष्ट्राच्या भूमीला मी वंदन करतो. आजचा हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आज जितका मी उत्साहित आहे तितकाच भावूकही आहे. आज आपल्या सर्वांचे आदर्श बाळगंगाधार टिळक यांची पुण्यतिथी आहे. आज महत्त्वाच्या दिवशी पुण्याच्या पुण्यभूमीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, पुरस्कार प्रदान मला केल्यानंतर माझ्यावरची आणखी जबाबदारी वाढली आहे. पुरस्कारा दरम्यान देणारा येणार निधी पंतप्रधान मोदींनी नमामि गंगे प्रकल्पासाठी अर्पण करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे.

English Summary: Tilak Award conferred on Prime Minister Narendra Modi
Published on: 01 August 2023, 01:14 IST