News

शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करणारी ग्रँड मराठा फाउंडेशन ही एक गैर - सरकारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त आठवडाभर दिवाळी दान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान कपड़े, स्टेशनरी, ब्लॅंकेट, बेडशीट, खेळणी, पिशव्या आणि फराळाचे आठवडाभर वाटप करून गरजुंची दिवाळी गोड करण्यात आली. ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलाटकर आणि ग्रँड मराठा फाउंडेशनच्या विश्वस्त श्रीमती माधवी शेलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाटप मोहीम राबविण्यात आली.

Updated on 23 November, 2023 4:45 PM IST

शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करणारी ग्रँड मराठा फाउंडेशन ही एक गैर - सरकारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त आठवडाभर दिवाळी दान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान कपड़े, स्टेशनरी, ब्लॅंकेट, बेडशीट, खेळणी, पिशव्या आणि फराळाचे आठवडाभर वाटप करून गरजुंची दिवाळी गोड करण्यात आली. ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलाटकर आणि ग्रँड मराठा फाउंडेशनच्या विश्वस्त श्रीमती माधवी शेलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाटप मोहीम राबविण्यात आली.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 4000 हून अधिक लोकापर्यंत हा लाभ पोहोचविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकरवाडा, मुंबई, ठाणे, कर्जत आणि सुधागड येथे आठवडाभर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या लाभार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांचे कुटूंब, आदिवासी समुदाय आणि वंचित घटकातील मुलांचा समावेश होता.

ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, "ग्रँड मराठा फाउंडेशन नेह‌मीच दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना चांगल्या सुविधा आणि शिक्षणा‌द्वारे लक्ष्य आणि उन्नत करण्यासाठी कटिबद्ध आहे. असंख्य कुटुबांच्या दिवाळी उत्सवात चमक आणता आल्याने हृदय आनंदाने आणि समाधानाच्या हास्याने भरले याचा आम्हाला आनंद वाटतो. आमची बांधिलकी मजबूत असून आम्ही शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो, सर्वांसाठी जीवनाचा दर्जा चांगला राखला जाईल याविषयी खातरजमा ठेवतो."

ग्रँड मराठा फाउंडेशनने आयोजित करण्यात आलेली आठवडाभर चालणारी वाटप मोहीम महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कटुंबांचे जीवनमान उंचावण्याच्या संस्थेच्या वचनबद्‌‌धतेचे उदाहरण म्हणता येईल. अत्यावश्यक वस्तू पुरवून आणि दिवाळीचा आनंद पसरवून, फाउंडेशनने एकता, करुणा आणि सामुदायिक आधार गरजूंच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतात हे दाखवून दिले आहे. शेतकन्यांना मदत करण्यासाठी, कृपया आमच्या फाउंडेशनला देणगी द्या असे आवाहन ही रोहित शेलाटकर यांनी केले आहे.

ग्रँड मराठा फाउंडेशनविषयी -
शेतकऱ्यांच्या नियमित आयुष्यात सतावणाऱ्या समस्या कमी करून त्यांचे जीवन समृदध करणे आणि शेतकऱ्यांना आगामी काळासाठी तयार करणे हे ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय आहे. तसेच ग्रँड मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठवळ पुरवले जाते, त्यामध्ये आधुनिक तंत्राची योग्य किंमत समाविष्ट असून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज व गरिबीचे दुष्टचक्र मोडीत काढून त्यांना चांगल्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते.

ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीने विशेष लक्ष हे विदर्भावर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक साहय देण्यात येते. त्याचप्रमाणे कृषी पट्ट्यात व ग्रामीण भागात शेतीपूरक कामांद्वारे विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शाळांना संगणक दान करुन त्यांनी ई - लर्निंगला प्रोत्साहन दिले जाते. हे फाउंडेशन महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर भागात शेतकरी व त्यांच्या कुटुबियांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील आहे.

English Summary: Through the efforts of Grand Maratha Foundation, more than 4000 underprivileged and needy people had a sweet Diwali
Published on: 23 November 2023, 03:04 IST