News

राज्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीन पिकाखालील लागवडीचे क्षेत्र हे 46 लाख 17 हजार हेक्टर पर्यंत पोहोचले परंतु खरीप क्षेत्राचा एकूण विचार केला तर सोयाबीनचे क्षेत्र तुलनेत 31.6 टक्के राहिले. सन 2020 च्या खरीप हंगामाचा विचार केला तर शेतकर्यांषकडे पुरेसे सोयाबीन बियाणे उपलब्ध नव्हते

Updated on 13 January, 2022 5:09 PM IST

राज्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीन पिकाखालील लागवडीचे क्षेत्र हे 46 लाख 17 हजार हेक्टर पर्यंत पोहोचले परंतु खरीप क्षेत्राचा एकूण विचार केला तर सोयाबीनचे क्षेत्र तुलनेत 31.6 टक्के राहिले. सन 2020 च्या खरीप हंगामाचा विचार केला तर शेतकर्‍यांकडे पुरेसे सोयाबीन बियाणे उपलब्ध नव्हते

त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातून बियाणे विकत घेऊन सोयाबीन लागवड केली होती. मात्र लागवड केलेल्या या सोयाबीनची उगवणन झाल्याने राज्यभरातून एक लाखाच्यावर शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कृषी विभागाला 15 ते 18 कोटी रुपये खर्च करावे लागले होते. या समस्येवर उपाय म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवून घेतला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे स्वतः उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांचे 900 कोटी रुपये वाचले आहेत आणि महत्वाचे म्हणजे एकही सोयाबीन बियाणे उगवण्याची तक्रार कृषी विभागाकडे पोहोचली नाही.

 कृषी विभागाने कशा पद्धतीने राबवला हा कार्यक्रम?

 सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमाच्या अंतर्गत कृषी आयुक्तालय या तर्फे शेतकऱ्यांकडून सोयाबीन बीजोत्पादन करून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी आणि गुरुवारी संवाद आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे दिवस निश्चित केले होते. त्याचा परिणाम असा झाला की 34 लाखांपैकी 24 लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी उत्पादित केली. 

नुसते सोयाबीन बीजोत्पादनच नाही तर नवीन लागवड करताना अंतर किती ठेवायचे,त्याची व्यवस्थित रित्या खत व्यवस्थापन तसेच सोयाबीनच्या काढणी पासून त्याची साठवण तसेच उगवण क्षमता इत्यादी गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात आले. याचा परिणाम असा झाला की सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन हे आठ ते दहा क्विंटल वरून चक्क 12 ते 14 क्विंटल पर्यंत पोहोचले.

English Summary: through soyabioen seed production farmer save 900 crore
Published on: 13 January 2022, 05:09 IST