कृषी पंपाच्या वीज बिलातून थकबाकी मुक्त होण्यासाठी थकबाकीचा रकमेत सुमारे 66 टक्के सूट मिळवण्याची संधी राज्य शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध असून यामध्ये जवळजवळ नाशिक परिमंडळातील दोन लाख 76 हजार 634 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे.
या योजनेच्या माध्यमातून वीज बिलांच्या झालेल्या वसुलीच्या माध्यमातून 66% कृषी आकस्मिक निधी म्हणजेच ते 30 टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा उपलब्ध झालेला निधी स्थानिक विजयंत्रणेच्या पायाभूत विकासासाठी खर्च करण्यात येत आहे.
कृषी पंपाच्या वीज बिलातून संपूर्ण थकबाकी मुक्ती व भरलेल्या 66 टक्के वीज बिलांच्या निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. आतापर्यंत नाशिक परिमंडळातील दोन लाख 76 हजार 634 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी थकबाकी व चालू वीज बिलापोटी 268 कोटी 67 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
नाशिक परिमंडळात एकूण 42 हजार 306 शेतकरी वीज बिल यांमधून संपूर्ण थकबाकी मुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 33 हजार 392 तर अहमदनगर जिल्ह्यातील आठ हजार 914 ग्राहकांचा समावेश आहे. त्यांनी चालू विजबिलासह सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केला आहे.( स्त्रोत-लोकमत)
Published on: 25 October 2021, 09:28 IST