मुंबई- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजूरांना सामाजिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. शासन दरबारी योजनेअभावी योजनांपासून वंचित राहावे लागते. सर्व श्रमिकांना लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टलची रचना केली आहे.
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय द्वारे असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवाहन केले जात आहे. आतापर्यंत देशभरातून 4.24 करोड अर्ज पोर्टलवर दाखल झाले आहेत.
श्रम व रोजगार मंत्रालयाद्वारे असंघटित क्षेत्रातील 38 कोटी मजूरांना 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी केला जाणार आहे. संपूर्ण देशात वैध असलेले श्रम कार्ड देखील प्रदान केले जाणार आहे. यामुळे असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी कामगारांना नवी ओळख प्राप्त होणार आहे.
हेल्थ इन्श्युरन्स कव्हर
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटूंबाला रुपये 5 लाखांचे हेल्थ इन्श्युरन्स कव्हर या योजनेअंतर्गत मोफत प्रदान केले जाते.
पेन्शनची हमी
असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी मासिक पेन्शनची रचना या योजनेमार्फत करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यावरील विक्रेत, मानवी रिक्षाचालक, बांधकाम मजूर आणि श्रमाच्या कामात गुंतलेले असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या वृद्धापकाळात पैशांची तरतूद या योजनेतून केली जाते. या योजने अंतर्गत महिन्याला तीन हजार याप्रमाणे वार्षिक 36 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
Published on: 21 October 2021, 10:27 IST