कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. कोरोना व्हायसरमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने अर्थव्यवस्था मंदावली होती. कोरोनाशी लढतात लढता अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आपल्या भाषणात म्हटले होते. कोरोनाच्या या संकटाला संधी म्हणून पाहायचे आहे. आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे देशभरात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात गरिबांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. स्वावलंबी भारत योजनेविषयी बोलताना आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत याची सविस्तर माहिती दिली.
स्वावलंबी भारत योजनेची ही इमारत पाच खांबावर राहील. पहिला खांब अर्थव्यवस्था, दुसरा खांब इन्फ्रास्ट्राचर, तिसरा खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारित, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचे कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केले. याविषयी माहिती देताना अर्थमंत्र्यांनी MSME क्षेत्राला मोठा दिलासा दिला. समाजातील अनेक घटकांशी संवाद साधून हे आर्थिक पॅकेज तयार करण्यात आले आहे. या पॅकेजद्वारे देशातील विकास वाढवण्याची योजना आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत योजना म्हटले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये लघु व कुटीर उद्योगांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
कोविड19 मुळे मोदी सरकारनेपंतप्रधानांना गरीब कल्याण योजना आणली आहे
देशातील गरिबांना उपाशी राहण्याची गरज नाही. गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक पॅकेजची घोषणा केली. लघु आणि कुटीर उद्योगांसाठी सहा मोठ्या योजना. लघु आणि कुटीर उद्योगांसाठी कोणत्याही गँरंटीशिवाय ३ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार. ४५ लाख लघु उद्योगांना ३१ ऑक्टबरपासून याचा फायदा मिळणार.
Published on: 13 May 2020, 05:59 IST