News

पुणे येथील डेक्कन कॉलेज ग्राउंड परिसरात डेअरी इंडस्ट्री एक्सपो २०२२ च आयोजन करण्यात आलं आहे. 12 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विविध विषयांवर तज्ञांच मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. फीड पाठशाळा या विषयाला धरून फीड मिलची कार्यक्षमता आणि नफा सुधारणे यावर चर्चा केली जाणार आहे.

Updated on 13 October, 2022 11:35 AM IST

पुणे येथील डेक्कन कॉलेज ग्राउंड परिसरात डेअरी इंडस्ट्री एक्सपो २०२२ च आयोजन करण्यात आलं आहे. 12 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विविध विषयांवर तज्ञांच मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या कार्यक्र माचा आज दुसरा दिवस आहे. फीड पाठशाळा या विषयाला धरून फीड मिलची कार्यक्षमता आणि नफा सुधारणे यावर चर्चा केली जाणार आहे.

दूध परिषद व्यवसायात नफा जोडण्यासाठी एक साधन म्हणून टिकाऊपणा वापरण्याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 14 ऑक्टोबरला डेअरी कॉन्फरन्स २०२२ अंतर्गत वाढत्या खर्चाची अस्थिरता, जागतिक संघर्ष, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि हवामानातील घटनांमध्‍ये परिवर्तन तसेच नवनिर्मितीची संधी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी काय करायचे यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच अनेक मशीन आणि त्यावर दुधापासून तयार होणाऱ्या अनेक गोष्टींसाठी अनेक वेगवेगळ्या मशीन याठिकाणी उपलब्ध आहेत. याची सविस्तर माहिती याठिकाणी दिली जात आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

IoTechWorld Avigation 100% स्वदेशी ड्रोन बनवणार, शेतकऱ्यांना मिळणार फायदा, किंमतही येणार मापात

या परिषदेत विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती सत्राचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत कृषी जागरण टीमची उपस्थिती देखील आहे. यामुळे ही परिषद फायदेशीर आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हे व्यवसायकडे वळाले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत.

शेतकरी का तोट्यात जातोय? औषधे आणि कीडनाशकांच्या किमतीवर लावलाय 18 टक्के जीएसटी

सध्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी हे सध्या समाधानी आहेत. तसेच अनेक शेतकरी हे दुधापासून अनेक वेगवेगळ्या गोष्टी तयार करत आहेत. यामध्ये पनीर, दही यासह अनेक पदार्थ तयार करत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे हे एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या;
लम्पीकडे दुर्लक्ष, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र
रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी मागणीपेक्षा डीएपी ४४ टक्के कमी आणि युरिया २८ टक्के कमी, शेतकरी चिंतेत
कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, केले कांदा बाजार सत्याग्रह तिरडी आंदोलन

English Summary: Three day dairy workshop organized Pune, farmers must visit once
Published on: 13 October 2022, 11:35 IST