कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र तसेच या क्षेत्रातील अग्रगण्य महत्त्वाच्या संस्था यांचे खूप मोठे योगदान आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित असलेले अनेक नवीन नवीन संशोधन तसेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत कृषी विद्यापीठ हे कायम अग्रेसर असतात. त्यांच्या या अनमोल संशोधन कार्याची मदत ही कृषिक्षेत्राला पर्यायाने शेतकऱ्यांना होत असते.
नक्की वाचा:कृषी दुतांनी केले मार्गदर्शन, फवारणीच्या वेळी घ्यावयाची काळजी
कृषी विद्यापीठांच्या सगळ्यात महत्त्वाच्या कामांपैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध पिकांच्या नवनवीन सुधारित वाणांची निर्मिती किंवा संशोधन हे होय. नवनवीन वाणांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात नक्कीच वाढ होते हे देखील तेवढेच सत्य आहे.
जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रामध्ये खूप मोलाचा सहभाग आणि वाटा आहे.
याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या खरीप ज्वारी, करडई आणि देशी कपाशी या तीन वाणांचा समावेश राष्ट्रीय राजपत्र अर्थात नॅशनल गॅझेट मध्ये करण्यात आला असून याची शिफारस केंद्रीय बियाणे समितीने केलेली होती. याबाबतची अधिसूचना 31 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.
नक्की वाचा:कृषि विद्यापीठ आणि कृषि विभागाचा प्रत्येक दिवस शेतकऱ्यांच्या सेवेसाठी – डॉ. विलास भाले
कोणत्या वाणांचा करण्यात आला समावेश?
यामध्ये करडईचा पीबीएनएस 184, खरीप ज्वारी पिकाचा परभणी शक्ती आणि देशी कपाशीचा पीए 837 या वाणांचा यामध्ये समावेश आहे. जर या वाणांचा शिफारस राज्यांचा विचार केला तर देशी कपाशीचे पीए 837 हे वाण आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात विक्रीसाठी वितरीत करण्यास
मान्यता देण्यात आली असून करडईच्या वाणास महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांसाठी विक्रीस मान्यता देण्यात आली आहे तर खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती या वाणास महाराष्ट्रासाठी मान्यता देण्यात आली आहे.
Published on: 08 September 2022, 06:42 IST