News

मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले आहे. साधारण दोन क्किंटल गहू सडला असून २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गहू सडल्याने गहूची खरेदी केली जाणार नाही. कृषी बाजार समितीच्या आवारात ठेवण्यात आलेल्या गहू ठेवण्यात आले होते. परंतु पावसाचा तडाखा बसल्याने बाजार समितीतील गहू पाण्यात सापडला असून हजारो क्किंटल गहू खराब झाला आहे.

Updated on 17 June, 2020 3:51 PM IST


मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले आहे.  साधारण दोन क्किंटल गहू सडला असून २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गहू सडल्याने गहूची खरेदी केली जाणार नाही.  कृषी बाजार समितीच्या आवारात ठेवण्यात आलेल्या गहू ठेवण्यात आले होते.  परंतु पावसाचा तडाखा बसल्याने बाजार समितीतील गहू पाण्यात सापडला असून हजारो क्किंटल गहू खराब झाला आहे.  मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एकूण लगभग तीन लाख हेक्टर जमीन शेतीसाठी उपयुक्त आहे. या रब्बी हंगामात १ लाख ८० हजार हेक्टर इतके गव्हाचे उत्पादन घेण्यात आले.

एकूण उत्पादित झालेल्या गव्हाचा एक भाग सरकारने मार्कफेड मध्य प्रदेश राज्य सहकारी विपणन संघ मर्यादित च्या माध्यमातून खरेदी केला. यासाठी ८२ खरेदी केंद्र बनविण्यात आले. उपकेंद्रात पाच जूनपर्यंत ३१ लाख ८५ हजार १२१.२९ मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली होती. गहू ठेवण्यासाठी गोदामे बनविण्यात आली आहेत.  परंतु ३२ केंद्रांमधील गहू हा मोकळ्या आवारात ठेवण्यात आला होता. यात पावसाने तडाखा दिल्याने मोकळ्या आवारातील गहू खराब झाला आहे.  दोन लाख ९ हजार ३१८ क्किंटल ( २० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त) इतका गहू खराब झाला आहे.   बाजारात असलेला गहू हा वाहतुकीसाठी तयार होता परंतु गव्हाऐवजी वाहतूक कर्त्यांनी तांदळाला पसंती देत त्याची वाहतूक केली.   यामुळे पावसाच्या पाण्यात गहू खराब झाला. दरम्यान वाहतुकीसाठी तयार असलेल्या अन्नधान्याची लगेच वाहतूक केली जाते. ७२ तासात धान्य गोदामात जमा करण्याचा नियम  मार्कफेडचा आहे. जर असे झाले नाही तर संबंधित परिवहनकर्त्यांवर कारवाई केली जाते.

खरेदी केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, वसूधा येथे २२, ७८६ क्किंटल गहू खराब झाला आहे. शेरगंज- रेउरा फार्ममध्ये २०,५४६, बकिया बैलोमध्ये १७  हजार ०९६, धौरहरा १६, ४४७, बतीमध्ये १२,५५५, आशीर्वाद गोदामात भटनवारा येथे १०, ७०५.५, गुडडुहरूमध्ये १०,५६०, पडरौतमध्ये १०, ०८६.५०, बरमेंद्र वेअर हाऊसमध्ये ८,४५१, पतौरा वेअर हाऊसमध्ये ८ हजार १६८, कुलगडी मध्ये ८,१०१, धौरहरा मध्ये ७, ९८४, मलगाव  ७,३००, भाजीखेरा शिवराजपूर ६,२६९, चोरमारी ४,७५०,  जर्नादनपूर ३,२२७, कुआंमध्ये २,२८० बदेरा मध्ये २ हजार, पिंपरी १,७१८, बर्ती अमरपाटन १,५००, सोनवारी ८००, बठियामध्ये ७००, रौड ६४८, मढीकलामध्ये ४८०, भैसवार ११०, कोटा कोडर आणि सुरदहा कला येथे १००, जसो येथे ७० अमकुई आणि दुरेहा येथे ५० क्किंटल गहू खराब झाला आहे.   लॉकडाऊनमुळे १५ एप्रिलपासून खरेदी सुरू झाली होती. पन्नास दिवसातच रिकॉर्ड ब्रेक खरेदी झाली होती.  परिणामी खरेदी केंद्रावर गहू ठेवण्याची व्यवस्था नव्हती. यामुळे गहू पावसाच्या तडाख्यात सापडला.

English Summary: Thousands of quintals of wheat Rotten ; Loss of Rs. 2 crore
Published on: 17 June 2020, 03:49 IST