News

सांगली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पाऊस झाल्याने तेथील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील डाळिंब तसेच द्राक्षे व भाजीपाला जो की सुमारे १२ हजार हेक्टरवर लावलेल्या पिकांना फटका बसलेला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहे. जिल्ह्यात असणाऱ्या निम्यापेक्षा जास्त द्राक्षाच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना मदत भेटावी अशी मागणी होत आहे.

Updated on 11 December, 2021 12:27 PM IST

सांगली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पाऊस झाल्याने तेथील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील डाळिंब तसेच द्राक्षे व भाजीपाला जो की सुमारे १२ हजार हेक्टरवर लावलेल्या पिकांना फटका बसलेला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार  कोटी  रुपयांचे  नुकसान  अवकाळी पावसामुळे (rain) झाले  आहे. जिल्ह्यात   असणाऱ्या निम्यापेक्षा जास्त द्राक्षाच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना मदत भेटावी अशी मागणी होत आहे. 

रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्यांचे मोठे नुकसान:-

काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊसाची सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने जिल्ह्यात आलेले काढणीला पीक तसेच द्राक्षाच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बागांमध्ये पाणी साचले असल्याने द्राक्षांचे घड कुजले आहेत तसेच रब्बी हंगामातील पिकांचे व भाज्यांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा दणका शेतकरी वर्गाला चांगलाच बसलेला आहे.

डाळिंब पिकाच्या 343 हेक्टर बागेचे नुकसान:-

सांगली जिल्ह्यात सुमारे ३८४ गावात अतिवृष्टी झालेली आहे जे की याचा परिणाम जिल्ह्यातील सुमारे १२ हजार हेक्टर पिकांवर झालेला आहे. यामध्ये १० हजार ६३९ हेक्टरवर द्राक्षाच्या बागेचे नुकसान झाले आहे तर ३४३ हेक्टरवर डाळिंब मका, ज्वारी, हरभरा, आणि भाजीपाला चे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागांना धुवून काढले:-

सांगली जिल्ह्यात ७९ हजार ४४० हेक्टरवर द्राक्षाचे क्षेत्र होते. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे यावेळी दीड महिना उशिरा द्राक्षाचा हंगाम सुरू झाला.हंगामाच्या पहिल्या टप्प्यात अवकाळी पावसाने दणका दिल्याने सुमारे २५ टक्के बागा वाया गेला. ज्या उरलेल्या होता त्या परवाच्या अवकाळी पावसाने धुवून काढल्या. जवळपास ५ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण जिल्ह्यामध्ये आहे यामधील ३ हजार कोटींवर अवकाळी पावसाने पाणी फिरवले आहे.

बहुतांश भागातील ऊसतोडी ठप्प:-

जिल्ह्यातील १ लाख २२ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे जे की १ कोटी टन ऊस गाळपासाठी तयार आहे. अवकाळी पावसामुळे हंगाम आधीच लांबला गेला आहे तसेच अवकाळीमुळे काही भागातील उसतोडी थांबलेली आहे. पाणी साचून राहिल्यामुळे अजून आठवडाभर हंगाम थांबणार आहे.

English Summary: Thousands of crores of rupees in water in Sangli district
Published on: 11 December 2021, 12:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)