भौगोलिक मानांकणाच्या नावाखाली वेगळ्याच शेतीमालाची विक्री होत आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे फळपिकांच्या बाबतीमध्ये असे प्रकार घडत आहेत. सध्या तर बाजारपेठेत फळांविषयी बोलायचे म्हणले तर आंबा पिकाच्या बाबतीत हे सर्व बघायला भेटत आहे. मुंबई च्या बाजारपेठेत हापूस आंब्याच्या नावाखाली दुसऱ्याच आंब्याची विक्री होत आहे. या सर्व गैरप्रकारावर कुठे तरी आळा बसावा म्हणून अनेक पर्याय शोधून काढले मात्र अजूनही असेच प्रकार सुरू आहेत. यावर आता पणन संचालकांनी कडक धोरण अवलंबिले असून जीआय मानांकन नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. अशा धोरणामुळे शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची जी फसवणूक असणार आहे ती टळणार आहे आणि दर्जदार माल भेटणार आहे.
बाजार समित्यांची काय असणार जबाबदारी :-
बाजार समित्यांचा शेतीमालाच्या खरेदी विक्रीवर अंकुश असतो जे की त्या नुसार राज्यात आवक झालेला शेतीमाल त्या नावाने राज्यात विकला जातो की नाही याची खात्री बाजार समितीने प्रशासनाला द्यावी लागते. त्या नुसार जर शेतीमालाची विक्री होत नसेल तर बाजार समित्या कारवाई करणार आहेत. मागील काही दिवसंपासून असे प्रकार घडत चालले असल्यामुळे पणन संचालकांना असा निर्णय घ्यावा लागला. बाजार समिती सोबतच शेती बचतगट, शेती उत्पादक कंपन्याना सूचना देण्यात आल्या आहेत.
‘जीआय’ प्राप्त उत्पादकांना काय करावे लागणार :-
जीआय मानांकणाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचववी लागणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जीआय अंतर्गत बागांची नोंदणी करावी लागणार आहे. तर शेतकऱ्यांना बागा व उत्पादनाचा क्यूआर कोड तयार करावा लागणार आहे. एवढेच नाही तर वेबसाईटवर नोंदनीधारक बागा व शेतकऱ्यांची यादी तयार करावी लागणार आहे.
आंबा फळपिकामध्ये अधिक फसवणूक :-
सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे जे की बनावट आंब्याची विक्री होत असल्याने प्रशासणाला कारवाई ची भूमिका घेण्यात आली आहे. ग्राहकांची हाऊस आंब्याची मागणी ओळखता इतर राज्यातून येणार हापूस आंबा असल्याचे भासवत असून विक्री केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला.
Published on: 04 April 2022, 04:09 IST