News

यंदाच्या वर्षी शेतीव्यवसाय हा पुर्णपणे निसर्गावर अवलंबून होता जे की शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला आहे. मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यामधील शेतकरी हळदीचे उत्पादन घेत असतात. जवळच वसमतची बाजारपेठ असल्याने पिकांचे दिवसेंदिवस क्षेत्र ही वाढतच चालले आहे. यंदा सतत चालू असलेला पाऊस तसेच ढगाळ वातावरण आणि बुरशीजन्य रोग या सर्व कारणांमुळे जे लागवड करताना वापरले जाणारे बेणे आहेत ते सुद्धा निघतायत की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. यंदा हळदीचे जवळपास ७५ टक्के उत्पादन घटेल असा अंदाज वर्तविला आहे.

Updated on 10 February, 2022 1:53 PM IST

कशामुळे ओढावली ही परस्थिती?

मराठवाड्यात हळदीचे पीक जोमात असतानाच अतिवृष्टी तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे हळदीच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे हळदीवर तसेच उत्पादनावर सुद्धा परिणाम झाला. या प्रकारचे वातावरण जास्त झाले असल्यामुळे पानांवर ठिपके पडले तसेच बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव झाला. कंधमाशीचा प्रादुर्भाव झाला असल्याने हळदीचे कंधच पूस होत गेले. हळदीच्या कंधावरच परिणाम झाला असल्याने हळदीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

उत्पादनात घट, दरामध्ये वाढ :-

मागणी कमी आणि पुरवठा जास्त असेल तर दर कमी होतात असे बाजारपेठेचे सूत्र आहे. यावेळी हंगामाच्या सुरुवातीला हळदीची आवकही कमी झाली होती जे की बजारपेठेत हळदीचे दर ८-९ हजार क्विंटल असे आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली त्यामुळे बाजारामध्ये आवकही कमी झाली. मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ ही हिंगोली मधील वसमत येथे आहे. बाजारात सध्या जुन्या हळदीची आवक सुरू आहे. जरी नव्या हळदीला भाव असले तरी त्याची आवक बाजारामध्ये होत नाही असे व्यापारी वर्ग सांगत आहे. प्रति वर्ष हळदीचे उत्पादन शेतकऱ्याला ३०-४० क्विंटल असते मात्र यंदा ५-६ क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना भेटले आहे.

मराठवाड्यातील हळद लागवडीचे चित्र :-

नांदेड, हिंगोली तसेच परभणी भागात हळदीचे उत्पादन घेतले जाते जे की याना हिंगोलीतील वसमत बाजारपेठ जवळ असल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीची लागवड २७ हजार हेक्टर तर नांदेड जिल्ह्यामध्ये २५ हजार हेक्टर तसेच परभणीमध्ये २ हजार ४०० हेक्टर लागवड करता येते. या हळदीला आंधरप्रदेश तसेच हैदराबाद वरून मागणी आहे.

English Summary: This year, turmeric growers have been hit hard, due to the vagaries of nature
Published on: 10 February 2022, 01:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)