खरीप हंगामपर्यंत कापसाच्या वाढत्या दराचा परिणाम पाहायला भेटणार आहे. जे की आतापर्यंतच्या वाढीव दरामुळे व्यापारी वर्ग तसेच जिनिंग चालक संतापले आहेत. परंतु शेतकऱ्यांना इथून पुढे बियाणाच्या वाढीव दराचा सामना करावा लागणार आहे. यंदाच्या वर्षी कापसाला प्रति क्विंटल ११ हजार रुपये असा दर मिळाला आहे जे की येणाऱ्या खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणार आहे. कापसाच्या बीजी 2 या बियाणाच्या पाकिटाचा दर ४३ रुपयांनी वाढवला जाणार असल्याचे सांगितले आहे अशाच अनेक सूचना सरकारने काढलेल्या आहेत. बियाणे उत्पादन, संशोधन व त्यावर होणाऱ्या खर्चाचा विचार करता बियाणांच्या दरात वाढ होणार आहे अशी अपेक्षा बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केली होती. जे की बीजी 2 या बियाणांच्या पाकिटाचा दर आहे तसाच ठेवला आहे तर बीजी 2 या बियाणांच्या पाकिटाच्या दरात ४३ रुपयांनी वाढ केली आहे.
उद्योजकांचे समाधान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका :-
कापसाला जी बियाणे लागतात त्या बियाणे निर्यातीसाठी जो वाढता खर्च पाहता उद्योजकांनी दराची वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जे की यानुसार बीजी 2 च्या पाकिटात ४३ रुपयांनी वाढ केलेली आहे. पाकिटात केलेल्या दरात अत्यल्प वाढ झालेली आहे असे व्यापारी सांगतात. यर दुसऱ्या बाजूला वाढीव दराचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे असेही काही नाही तसेच सर्वच शेतकऱ्यांना विक्रमी दर भेटलेत असेही काही नाही. भविष्यात वाढती मागणी बघता हे दर वाढवले असल्याचा आरोप केला जात आहे.
कापूस बियाणे दरात काय झाले बदल?
यंदा कापसाच्या बियाणात वाढ केली असून अमलबजावणी सुद्धा केली गेली आहे. देशात बीजी 1 आणि बीजी 2 बियाणांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तर उद्योजक सांगतात की बियाणे निर्मिती करण्यासाठी होणारा जो खर्च आहे तो सुद्धा वाढलेला आहे. जे की यानुसार बीजी 2 या बियाणांच्या पाकिटात ४३ रुपयांनी वाढ म्हणजेच ७६७ रुपयांनवरून ८१० रुपये वर पाकीट गेले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना वाढीव दर देऊन बियाणांची खरेदी करावी लागणार आहे.
यंदा कापसाचे क्षेत्रही वाढणार :-
यंदा कधी न्हवे कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळालेला आहे जे की यामुळे शेतकरी कापूस लागवडीवर भर देत आहेत. बियाणांच्या दरात वाढ जरी झाली तरी कापूस क्षेत्रावर त्याचा परिणाम काय होणार नाही. लातूरचे कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने सांगतात की शेतकऱ्यांना फक्त वाढीव उत्पादनाची आणि वाढीव दराची अपेक्षा आहे. जे की वर्षानुवर्षे घटत चाललेल्या कापसाच्या क्षेत्रात यंदा बदल होणार आहेत
Published on: 20 March 2022, 07:53 IST