News

खरीप हंगामप्रमाणेच रब्बी हंगाम अनेक संकटावर मात करत अंतिम टप्यात पोहचला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच ज्वारी ही मुख्य पिके काढणीला आलेली आहेत. दरवर्षी रब्बी हंगामातील सुगीचा काळ हा दीड महिने चालतो मात्र यंदा सुगीच्या दरम्यान चार दिवसात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी शेतीकमे उरकून गव्हाची कापणी आणि मळणीची कामे हार्वेस्टरच्या माध्यमातूनच उरकली आहेत. हार्वेस्टरच्या माध्यमातूनच कामे केल्याने वेळेची बचतही झाली त्याचबरोबर ढगाळ वातावरणाचा धोका ही टळला. आतापर्यंत यंत्राचा वापर म्हणले की शेतकरी पाठ फिरवायचे मात्र आता परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भाग पाडले आहे. मराठवड्यात मजुरांची जागा यंत्राने घेतलेली आहे.

Updated on 26 March, 2022 4:43 PM IST

परराज्यातून हार्वेस्टर मराठवाड्यात :-

मराठवड्यात हार्वेस्टर सारखे यंत्र अजून जास्त प्रमाणत नाही. रब्बी व खरीप हंगाम सुरू होताच हरियाणा, पंजाब मधून मशीन दाखल होतात. जे की या मशिनरीमुळे गव्हाची कापणी आणि मळणीचे काम सोपे झाले आहे. मजुरांसाठी शेतकऱ्याला जी भटकंती करावी लागत होती ती सुद्धा कमी झालेली आहे तसेच शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचत होता. यंदा सुगीच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार झाले असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकून घेतली.

खर्चही कमी अन् नासाडीही टळली :-

एका एकरात गहू करण्यासाठी जे की काढणी, बांधणी आणि पुन्हा मळणी करण्यासाठी जवळपास १० मजूर लागतात मात्र हेच काम हार्वेस्टरद्वारे केले तर फक्त अर्धा तास लागतो. प्रति एकर शेतकऱ्यांना २ हजार रुपये मोजावे लागतात. मजुरांकडून जी पिकाची नासाडी होते ती याद्वारे टळलेली आहे. हंगाम सुरू होताच मजुरांची टंचाई भासायला सुरू होते. तसेच यंदाच्या हंगामात मजुरांची हजरी ५०० रुपयांवर गेलेली आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा शेतकरी आता आधुनिक यंत्राची कास धरायला लागले आहेत.

ढगाळ वातावरणाचा धोका कायम :-

उन्हाळा ऋतू सुरू होताच निसर्गाने आपला लहरीपणा दाखवायला सुरू केले आहे. जे की भर उन्हाळ्यात ढगाळ तर पावसाचे वातावरण झाले आहे त्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. रब्बी हंगामातील पिकांची काढणीची कामे सुरू असताना पावसाने हजेरी लावली तर न भरून निघणारे नुकसान होणार आहे. दोन दिवसांसाठी निसर्गाचा लहरीपणा ठरलेला असतो मात्र यंदा आठ दिवस उलटले तरी ढगाळ वातावरण आहे. जे खरीप हंगामात झाले ते रब्बी हंगामात होऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

English Summary: This year, the farmers used modern techniques during the harvest, saving time and saving labor costs
Published on: 26 March 2022, 04:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)