News

पुणे : देशात डाळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये यावर्षी तिपटीने वाढ झाली असून देश डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो असे केंद्रीय कृषीमंत्र्यालयातील सूत्रांनी सांगितले आहे. सरकारतर्फे यावर्षी २.५६ कोटी टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट मागच्या वर्षीपेक्षा ११.२% ने जास्त आहे.

Updated on 26 July, 2020 11:29 AM IST

सरकारतर्फे यावर्षी २.५६ कोटी टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट मागच्या वर्षीपेक्षा ११.२% ने जास्त आहे.  यंदा खरिपामध्ये देशातील एकजण डाळींच्या उत्पादनापैकी ३०% एवढी लागवड झाली आहे. त्यामुळे  एकूण उत्पादनामध्ये २०%  वाढ होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी खात्याने वर्तवला आहे.

तसेच यावर्षी भारतात एकूण  खरिपाखालील लागवडीमध्ये २१% वाढ  झाली  आहे. यावर्षी  वेळेवर आलेला मॉन्सून आणि धरणामध्ये असलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे यंदा १७ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा मागच्या  वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल २१% नी वाढला आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत ५७०.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यावर्षी १७ जुलैपर्यंत ६९१.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे.

भारत हा डाळीचे उत्पादन  देश आहे. मागच्या काही वर्षात सालीच्या उत्पादन कमी झाल्याने देशात डाळींचा तुटवडा निर्माण झाला होता. २०१६-१७ च्या दरम्यान डाळींचे भाव गगनाला भिडले होते.  महाराष्ट्रात तूरडाळीचा भाव पर प्रतिकिलो २०० रुपये पर्यंत पोहचला होता. केंद्र सरकारने या परिस्थितीचा विचार करून डाळींच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या माध्यमातून उत्तेजन दिले होते. त्याचाच हा परिणाम म्हणून डाळीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.आजमितीला देशात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. येथून पुढे पावसाची वाटचाल कशी राहणार यावर उत्पादन अवलूंबून राहणार आहे.

English Summary: This year, the country will be self-sufficient in pulses production
Published on: 25 July 2020, 04:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)