1. बातम्या

यावर्षी देश डाळींच्या उत्पादनात होणार स्वयंपूर्ण

KJ Staff
KJ Staff
Pulses

Pulses

सरकारतर्फे यावर्षी २.५६ कोटी टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट मागच्या वर्षीपेक्षा ११.२% ने जास्त आहे.  यंदा खरिपामध्ये देशातील एकजण डाळींच्या उत्पादनापैकी ३०% एवढी लागवड झाली आहे. त्यामुळे  एकूण उत्पादनामध्ये २०%  वाढ होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी खात्याने वर्तवला आहे.

तसेच यावर्षी भारतात एकूण  खरिपाखालील लागवडीमध्ये २१% वाढ  झाली  आहे. यावर्षी  वेळेवर आलेला मॉन्सून आणि धरणामध्ये असलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे यंदा १७ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा मागच्या  वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल २१% नी वाढला आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत ५७०.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यावर्षी १७ जुलैपर्यंत ६९१.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे.

भारत हा डाळीचे उत्पादन  देश आहे. मागच्या काही वर्षात सालीच्या उत्पादन कमी झाल्याने देशात डाळींचा तुटवडा निर्माण झाला होता. २०१६-१७ च्या दरम्यान डाळींचे भाव गगनाला भिडले होते.  महाराष्ट्रात तूरडाळीचा भाव पर प्रतिकिलो २०० रुपये पर्यंत पोहचला होता. केंद्र सरकारने या परिस्थितीचा विचार करून डाळींच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या माध्यमातून उत्तेजन दिले होते. त्याचाच हा परिणाम म्हणून डाळीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.आजमितीला देशात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. येथून पुढे पावसाची वाटचाल कशी राहणार यावर उत्पादन अवलूंबून राहणार आहे.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters