News

औरंगाबाद : दोन वर्षांपासून मका पिकावर होत असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव, घटलेला बाजारभाव आणि तसेच लागवडीसाठी मजुरीचे वाढलेले दर पाहता मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटू शकतात. रब्बी हंगामात मक्याची सरासरीपेक्षा जवळपास अडीचशे टक्क्यांनी अधिक लागवड झाली होती. कापसाचेही क्षेत्र २० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांचा कल पाहता सोयाबीन, तुरीची लागवड अधिक क्षेत्रावर होऊ शकते.

Updated on 19 June, 2021 8:11 PM IST

औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना व बीड हे तीन जिल्हे येत असून यामध्ये रब्बीचे एकूण ६ लाख ६४ हजार ३६ एवढय़ा सरासरी हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ५ लाख ४१ हजार ६८२ म्हणजे ८१.५७ टक्के रब्बीचा पेरा झालेला आहे. त्यातील ९७.५३ हेक्टरवर मक्याची पेरणी झालेली होती. औरंगाबाद जिल्ह्य़ात लागवडीची टक्केवारी तब्बल २४७.६८ एवढी होती

रोहिणी नक्षत्रातील पंधरा दिवसांपैकी आठ ते दहा दिवस बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र, यातील बहुतांश शेतकरी कापसाची लागवड करत असल्याचे चित्र असले तरी गतवर्षी लांबलेला पाऊस आणि त्याचा कापसालाही बसलेला फटका पाहता यंदाही कापूस मोठय़ा क्षेत्रावर लावण्याची मनस्थिती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा मका पिकाकडेही शेतकऱ्यांचा लागवडीचा फारसा ओढा दिसत नाही. गत दोन वर्षांपासून मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे मका लागवड करण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही. गतवर्षी मका पिकाला बाजारात दरही हजार ते अकराशे रुपये क्विंटलपर्यंतच मिळाला. याशिवाय करोनामुळे विदेशात जाणारा मका निर्यात होऊ शकला नाही. स्टार्च करणाऱ्या कंपन्यांकडूनही करोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी नव्हती. परिणामी दर गडगडले होते.

English Summary: This year, the area under cotton is likely to be reduced by 20 per cent
Published on: 19 June 2021, 06:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)