News

सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला (FRP) मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने उसाचा भाव म्हणजे FRP ही 305 रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे.

Updated on 04 August, 2022 11:55 AM IST

सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने साखर हंगाम 2022-23 साठी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला (FRP) मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने उसाचा भाव म्हणजे FRP ही 305 रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे.

आता उसाची FRP ही प्रतिटन 3 हजार 50 रुपये असणार आहे. कॅबिनेट समितीने (CCEA) ऑक्टोबर 2022 पासून सुरु होणाऱ्या खरेदी वर्षासाठी उसाच्या दरात वाढ केली. यापूर्वी प्रतिक्विंटल  उसाची FRP ही 290 रुपये होती. त्यामध्ये 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे देशात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत.

असे असताना मात्र उसाचा खर्च मोठ्या प्रमाणवर वाढला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. वाढीव एफआरपी साखर हंगाम 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल. सध्या खताच्या मजुरीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी याबाबत मागणी करत आहेत. 2021 मध्ये एफआरपी केवळ 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये करण्यात आली.

तुम्ही नेमके आहात कोण? कोर्टाचा शिंदे गटाला थेट सवाल, निर्णय विरोधात जाण्याची शक्यता

दरम्यान, सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ अंतर्गत एफआरपी निश्चित करते. यासाठी कृषी खर्च आणि किंमत आयोग शिफारस करतो. एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 15 रुपयांनी वाढ करण्याची कॅबिनेट नोट यापूर्वीच जारी करण्यात आली होती. एफआरपी वाढल्यानंतर काही राज्यांच्या सरकारांवर उसाच्या दरात वाढ करण्याचा दबावही वाढतो.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत

खते, पाणी, कीटकनाशके, मजूर सर्वच महाग झाले आहेत. त्यानुसार भावात वाढ करावी. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक आकडा जाहीर केला होता. त्यानुसार 2013-14 च्या साखर हंगामात उसाची एफआरपी केवळ 210 रुपये प्रतिक्विंटल होती. पण तो ९.५ टक्के साखर वसुलीवर आधारित होता.

महत्वाच्या बातम्या;
खासदारांकडून टाळ्यांचा कडकडाट, सभापतींकडून कौतूक, खासदार हरभजन सिंगने केला महत्वाच्या मुद्दा उपस्थित
शेतकऱ्यांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत जाहीर करा, अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी...
केंद्राकडून मोठी सूचना! मंकीपॉक्सचा धोका वाढल्याने घेतला निर्णय..

English Summary: This year sugarcane will get FRP of 3 thousand 50 rupees, a big relief to the farmers
Published on: 04 August 2022, 11:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)