News

Cotton Rate :- मागचा हंगाम हा कापूस उत्पादकांसाठी खूप नुकसानदायक ठरला असे आपल्याला म्हणावे लागेल. कारण त्याच्या मागच्या वर्षीचा विचार केला तर कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला होता व मागच्या हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल अशी रास्त अपेक्षा होती. परंतु कापसाने ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरवली. परंतु यावर्षी कापुस बाजारभावाची स्थिती उत्तम राहील अशी काहीसी जागतिक स्तरावर परिस्थिती असल्यामुळे यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

Updated on 20 August, 2023 10:21 AM IST

Cotton Rate :- मागचा हंगाम हा कापूस उत्पादकांसाठी खूप नुकसानदायक ठरला असे आपल्याला म्हणावे लागेल. कारण त्याच्या मागच्या वर्षीचा विचार केला तर कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला होता व मागच्या हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल अशी रास्त अपेक्षा होती.

परंतु कापसाने ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरवली. परंतु यावर्षी कापुस बाजारभावाची स्थिती उत्तम राहील अशी काहीसी जागतिक स्तरावर परिस्थिती असल्यामुळे यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापूस उत्पादनाची स्थिती काय राहील?

 अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले की जागतिक आपण उत्पादन 6% ने कमी राहिल. कारण कापूस उत्पादनाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या चीन, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये कापूस पिकाला फटका बसला आहे. या देशांचा कापूस उत्पादनामध्ये 70 टक्के वाटा आहे व कापूस उत्पादनात चीन आघाडीवर असतो  व चीनला स्वतः कापूस जास्त लागतो. चीन नंतर भारतात कापसाचे उत्पादन जास्त होते. आपल्याकडे देखील कापसाची गरज वाढली आहे. चीनचे कापूस उत्पादन 12 टक्क्यांनी व भारताचे उत्पादन दोन टक्क्याने कमी होणार असल्याचे मत जाणकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

परंतु भारतातील कापूस वापर मात्र चार टक्क्यांनी वाढणार आहे. यासोबतच अमेरिका व ब्राझीलमध्ये ही कापसाची ही स्थिति राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच जगाला 70% कापूस पुरवठा करणाऱ्या या देशांमध्ये कापसाचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणचे कापूस उत्पादन कमी राहण्यामागे कमी पाऊस हे कारण आहे. अमेरिकेत देखील पावसाने दडी मारल्यामुळे कापूस उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक कापूस उत्पादनाचा एकंदरीत अंदाज आणि पावसाची स्थिती पाहून यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 कापसाचे भाव चांगले राहतील म्हणजे कशी राहील परिस्थिती?

 कापसाचे भाव चांगले राहतील म्हणजे ते वाढतच राहतील असे नव्हे. कापसाच्या बाजारभावावर अनेक घटकांचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. यामुळे बाजार भाव मध्ये आपल्याला चढ-उतार दिसून येतो.बरेच शेतकरी भाव वाढीच्या अपेक्षेने  कापूस विकत नाहीत. परंतु काही कारणास्तव जो भाव आहे त्याच्यापेक्षा देखील खाली भाव घसरतात व आपल्याला पश्चाताप होतो. याकरता शेतकऱ्यांनी एका क्विंटलसाठी  किती खर्च आला याचे गणित काढून जर त्यानुसार विक्रीचे नियोजन केले तर नक्कीच फायद्याचे ठरू शकते. 

कारण जर आपण एका क्विंटलचा खर्च काढला तर आपल्याला नेमका अंदाज येतो की आपल्याला किती भावात कापूस विकणे परवडेल. त्यामुळे आपला अपेक्षेचा भावा आला तर तो  टप्प्याटप्प्याने विकण्याचे नियोजन करण्यास फायद्याचे ठरू शकते. कारण सगळाच माल चांगल्या भावासाठी साठवून ठेवणे देखील योग्य नाही. जर कालांतराने भावात घसरण झाली तर संपूर्ण मालाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कापूस टप्पा करून विकणे खूप फायद्याचे ठरू शकते.

English Summary: This year cotton will be the gold of farmers? This international cotton situation will cause
Published on: 20 August 2023, 10:21 IST